निकृष्ट दर्जाचे काम असल्याने नाली गेली वाहून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 04:10 AM2021-06-21T04:10:17+5:302021-06-21T04:10:17+5:30
वरुड/शेंदुरजनाघाट : मलकापूर पुनर्वसन ते मरामाय खेडी रस्त्यालगत वैशिष्ट्यपूर्ण निधीतून २८ लाख रुपयांच्या नालीचे बांधकाम सुरू आहे. हे काम ...
वरुड/शेंदुरजनाघाट : मलकापूर पुनर्वसन ते मरामाय खेडी रस्त्यालगत वैशिष्ट्यपूर्ण निधीतून २८ लाख रुपयांच्या नालीचे बांधकाम सुरू आहे. हे काम निकृष्ट दर्जाचे आहे. नालीच्या भिंती तळातूनच पडल्याने निकृष्ट कामाचा उत्कृष्ट नमुना नागरिकांना पहावयास मिळत आहे. गावाच्या विकासापेक्षा ठेकेदाराचा विकास सुरू असून याकडे नगर परिषद बांधकाम अभियंत्याचे दुर्लक्ष होत असून लाखो रुपयांचा खर्च निष्कारण होत असल्याची चर्चा आहे. नालीच्या कामाची गुण नियंत्रण विभागाकडून तपासणी करून ठेकेदाराविरुद्ध कार्यवाहीची मागणी नागरिकांनी केली आहे.
मलकापूर पुनर्वसन ते मरामाय खेडी रस्त्यालगत वैशिष्ट्यपूर्ण निधीअंतर्गत २८ लाख रुपयांचे नालीचे बांधकाम सुरू आहे. हे काम निकृष्ट दर्जाचे होत आहे. लाखो रुपयांचा खर्च नालीच्या बांधकामावर होत असताना निकृष्ट कामावर नगरपरिषदेचे दुर्लक्ष होत असल्याने ठेकेदाराचे चांगभलं आहे. सिमेंट रेतीच्या प्रमाणात कमतरता करून लोखंडाची जाळीही केवळ नावापुरती वापरून भ्रष्टाचार केल्या जात असल्याचे पावसाच्या पाण्याने नाली वाहून गेल्यानंतर नागरिकांच्या लक्षात आले. निकृष्ट कामाचे उत्कृष्ट नमुने दिसत असल्याने पहिल्याच पावसाने नाली वाहून गेली. विकासकामांच्या बांधकामावर नगर परिषदेचे दुर्लक्ष असल्याने ठेकेदारांचे चांगभलं सुरू आहे. २८ लाख रुपयाच्या निधीची वाट लागली आहे. परंतु पहिल्या पावसात नाली वाहून गेल्यावर संबंधित ठेकेदारावर काय कारवाई होते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे . तर गुण नियंत्रक विभागाकडून तपासणी केल्यानंतर कामाचे देयक देण्यात यावे अशी मागणी शेंदुरजनाघाट येथील नागरिकांनी केली आहे