तळेगाव दशासर येथे नालीचे सांडपाणी रस्त्यांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:10 AM2021-06-01T04:10:16+5:302021-06-01T04:10:16+5:30
तळेगाव दशासर : स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षाने नालीचे सांडपाणी रस्त्यांवर आले आहे. गावातील काही भागांत नाल्यांची सफाई ...
तळेगाव दशासर : स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षाने नालीचे सांडपाणी रस्त्यांवर आले आहे. गावातील काही भागांत नाल्यांची सफाई काम झाले असून, अद्यापही काही भागांत नाल्यांची सफाई रखडल्याचा ग्रामस्थांचा आक्षेप आहे.
तळेगावात काही भागातील नाल्या घाणीमुळे तुडुंब भरल्या. नाल्यांतील सांडपाणी रस्तावरून वाहत असल्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. विशेषतः गावातील मुख्य रस्त्यालगतच्या हनुमान मंदिरात जाणाऱ्या नागरिकांना वाहनामुळे उडणारे नाल्यांतील पाणी अंगावर झेलत वा त्यापासून वाचण्याची धावपळ करीत वाट काढावी लागते. दुचाकीचालक भरधाव वेगाने येत असल्याने रस्त्यावरील घाण पाणी अंगावर उडून वाद होण्याची शक्यता वाढली आहे. पावसाळा सुरु झाला असूनसुद्धा ग्रामपंचायत प्रशासनाला जाग येत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.