स्मार्ट सिटीचा स्वप्नभंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2019 11:25 PM2019-02-11T23:25:19+5:302019-02-11T23:26:21+5:30
स्मार्ट सिटीसंदर्भात या आठवड्यात पुन्हा जाहीर झालेल्या रँकिंगमध्ये अमरावती १५ व्या स्थानावर असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. मात्र, ही अमरावती आंध्र प्रदेशाची राजधानी असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. यापूर्वी जाहीर झालेल्या स्मार्ट सिटीच्या यादीमध्ये पहिल्या शंभरतही अमरावती शहर नव्हते. तथापि, स्मार्ट सिटीच्या नावावर करोडोंचा चुराडा झालेला आहे.
अमरावती : स्मार्ट सिटीसंदर्भात या आठवड्यात पुन्हा जाहीर झालेल्या रँकिंगमध्ये अमरावती १५ व्या स्थानावर असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. मात्र, ही अमरावती आंध्र प्रदेशाची राजधानी असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. यापूर्वी जाहीर झालेल्या स्मार्ट सिटीच्या यादीमध्ये पहिल्या शंभरतही अमरावती शहर नव्हते. तथापि, स्मार्ट सिटीच्या नावावर करोडोंचा चुराडा झालेला आहे.
चार दिवसांपूर्वी केंद्र शासनाद्वारा स्मार्ट सिटीचे रँकिंग जाहीर करण्यात आले. यामध्ये ३६०.२१ गुण घेऊन नागपूर देशात प्रथम स्थानावर, तर १४९.४ गुणांसह अमरावती पंधराव्या स्थानावर आहे. या अमरावतीच्या नावामुळे शहरात चर्र्चेेचा विषय बनला आहे. तथापि, ही अमरावती आंध्र प्रदेशची राजधानी असल्याचे स्पष्ट होताच नागरिकांचा हिरमोड झाला. स्मार्ट सिटीच्या डीपीआरसाठी महापालिकेला दोन कोटीचा निधी प्राप्त झाला होता. अमरावती आता स्मार्ट सिटी होणार नाही, हे स्पष्ट झाल्याने दोन वर्षा$ंपासून स्वप्न दाखवून जनतेच्या कराचा पैसा उडविल्याचा आरोप विरोधी पक्षनेता बबलू शेखावत यांनी केला आहे. शासनाला दोन कोटी परत करण्याची तयारी महापालिका प्रशासन करीत असल्याने शहर कधीच स्मार्ट सिटी होणार नाही. भारतातसुद्धा एकही शहर स्मार्ट सिटी झालेले नाही. अमरावतीकरांना खोटी आश्वासने देऊन आतापर्यंत स्मार्ट सिटीच्या नावावर प्रशासनाने किती पैसा खर्च केला, याचा लेखाजोखा शेखावत यांनी आयुक्तांना पत्राद्वारे मागितला आहे.
स्मार्ट सिटीच्या यादीत शहराचे नाव नाही. याविषयीचा निधी अद्याप परत केलेला नाही. याबाबत काय करायचे, ते लवकरच ठरवू.
- संजय निपाणे
आयुक्त, महापालिका.