दारूऐवजी कीटकनाशक प्यायला, उपचारादरम्यान मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2023 02:50 PM2023-02-20T14:50:07+5:302023-02-20T14:51:25+5:30

दस्तुरनगरातील घटना

Drinking insecticide instead of alcohol, death during treatment | दारूऐवजी कीटकनाशक प्यायला, उपचारादरम्यान मृत्यू

दारूऐवजी कीटकनाशक प्यायला, उपचारादरम्यान मृत्यू

googlenewsNext

अमरावती : दारूऐवजी चुकीने कीटकनाशक प्यायल्याने एका ५३ वर्षीय व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी फ्रेजरपुरा पोलिसांनी शनिवारी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. देवीदास अंबादास खरड (५३, रा. न्यू कॉलनी, दस्तुरनगर) असे मृताचे नाव आहे.

तक्रारीनुसार, ११ फेब्रुवारी रोजी दुपारी ३.३० च्या सुमारास देवीदास खरड हे घराबाहेर उलट्या करत होते. ती बाब त्यांचा मुलगा शुभमला माहीत होताच तो तातडीने घराबाहेर आला. त्यावेळी खरड यांचा दारूचा पेला लॉनमध्ये आढळून आला. त्याने लगेच वडिलांना काय होते आहे, अशी विचारणा केली. त्यावेळी आपण चुकीने फवारा मारण्याचे औषध घेतल्याचे त्यांनी मुलाला सांगितले. त्यांना तातडीने एका खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, १४ फेब्रुवारी रोजी पहाटे ५.२० वाजता त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

याबाबत फ्रेजरपुरा पोलिसांना देखील माहिती देण्यात आली. तेथील पोलिस उपनिरीक्षक अनुसया पचारे यांनी दवाखाना व शवविच्छेदनगृह गाठून पंचनामा केला. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह खरड कुटुंबीयांच्या ताब्यात दिला. त्यानंतर आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.

Web Title: Drinking insecticide instead of alcohol, death during treatment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.