गरजेपेक्षा जास्त पाणी पिणे ठरू शकते अपायकारक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:15 AM2021-09-23T04:15:22+5:302021-09-23T04:15:22+5:30

अमरावती : शरीरातील पाण्याचे प्रमाण हे व्यक्तीचे वय व त्यांचे वजनावर अवलंबून असते. किंबहुना किडणी किती पाणी बाहेर फेकते, ...

Drinking too much water can be harmful! | गरजेपेक्षा जास्त पाणी पिणे ठरू शकते अपायकारक!

गरजेपेक्षा जास्त पाणी पिणे ठरू शकते अपायकारक!

Next

अमरावती : शरीरातील पाण्याचे प्रमाण हे व्यक्तीचे वय व त्यांचे वजनावर अवलंबून असते. किंबहुना किडणी किती पाणी बाहेर फेकते, हे महत्त्वाचे आहे. किती पाणी प्यावे, हे त्या व्यक्तीचे वय व वजन यावर अवलंबून आहे. याशिवाय विविध आजारांतील व्यक्तींनीदेखील पुरेसे पाणी पिणे महत्त्वाचे असल्याची माहिती युरोलॉजिस्टनी दिली.

मानवी आरोग्यात पाण्याला जीवन म्हटले गेले आहे. शरीराला आवश्यक घटनांपैकी पाणी हा महत्त्वाचा घटक आहे. याचा अभ्यास व माहिती आपण शालेय स्तरापासून शिकत आलो आहोत. निरोगी शरीरासाठी दिवसभरात किमान दोन लिटर तरी पाणी पिणे महत्त्वाचे आहे. शरीरात ६० टक्के भाग पाण्याचा आहे. यामध्ये लघवी व घामाद्वारे पाणी शरीर उत्सर्जित करीत असते. त्यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊ नये, याकरिता पुरेशा प्रमाणात पाणी पिणे महत्त्वाचे आहे.

पाणी किती प्यावे, यामध्येही अनेक मते आहेत. यामध्ये व्यक्तीचे वय व त्याचे वजनानुसार पाणी पिणे महत्त्वाचे आहे. शरीराला एका दिवसात किमान दोन लिटर तरी पाणी आवश्यक असल्याची माहिती या विषयाचे तज्ज्ञ डॉ. विशाल बाहेकर यांनी दिली. काहींच्या मते, तहान नसली तरी थोडे-थोडे पाणी पिणे आरोग्यासाठी आवश्यक आहे.

शरीरात लाळेची निर्मिती, चयापचय रक्ताभिसरण, शरीराचे तापमानाचे व्यवस्थापन, चयापचय प्रक्रियेदरम्यान विषारी पदार्थाचे उत्सर्जन आदी सर्व क्रियांसाठी पाणी महत्त्वाचे आहे. मात्र, नुसतेच पाणी पित राहणेदेखील उपायकारक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

बॉक्स

शरीरात पाणी कमी पडले तर...

शरीराला पुरेसे पाणी महत्वाचे आहे. पाण्याचे प्रमाण कमी झाल्यास किडनी स्टोन आदी विकार होतात. घामाद्वारे पाणी जास्त बाहेर पडल्यास शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होऊन डीहाड्रेशन होते. यामुळे थकवा येऊन रक्तदाबही कमी होतो. त्यामुळे दोन ते तीन तरी पाणी पिणे महत्त्वाचे आहे.

बॉक्स

शरीरात पाणी जास्त झाले तर...

आवश्यकतेपेक्षा जास्त पाणी पिल्यास वारंवार लघवीला जावे लागते. त्या व्यक्तीच्या झोपेवरही व मानसिक स्वास्थ्यावरही याचा परिणाम होतो. त्यामुळे शरीराला आवश्यक तेवढेच पुरेसे पाणी पिणे महत्त्वाचे आहे.

बॉक्स

कोणी किती पाणी प्यावे?

कोणी किती पाणी प्यावे, याबाबत वेगवेगळे मतप्रवाह आहे. यामध्ये वयोगटासोबतच त्या व्यक्तीचे वजन किती आहे, हेदेखील महत्त्वाचे आहे. सामान्य परिस्थितीत दिवसभरात दोन लिटर पाणी पुरेसे आहे. १५ वर्षांपर्यंतच्या मुलासाठी दीड लीटर, तरुणाईने व ज्येष्ठ व्यक्तींनी दोन ते अडीच लिटर व ज्येष्ठांनी दोन लिटर पाणी पिणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.

कोट

सामान्य परिस्थितीत प्रत्येकाने दोन लिटरपर्यंत पाणी पिणे महत्त्वाचे आहे. दिवसभरात ५०० मिलि पाणी लघवीद्वारे बाहेर पडते. मुलांमध्ये हे प्रमाण दर तासाला ३० मिलि ऐवढे आहे. किडणीच्या स्वास्थ्यानुसार, किती पाणी बाहेर फेकते, हे देखील महत्वाचे आाहे. वयापेक्षा त्या व्यक्तीच्या वजनानुसार पाण्याचे प्रमाण महत्त्वाचे आहे.

- डॉ. विशाल बाहेकर, एमएस (किडनी न्यूरोसर्जन)

Web Title: Drinking too much water can be harmful!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.