वाहन हळू चालवा, जिल्ह्यात ३२ ठिकाणे जीवघेणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 04:22 AM2021-02-18T04:22:47+5:302021-02-18T04:22:47+5:30
संदीप मानकर /अमरावती : जिल्ह्यात ३२ ब्लॅकस्पॉटवर आतापर्यंत ९०७ अपघाताच्या घटना घडल्या. त्यात ३६२ जणांचे बळी गेले. ही धक्कादायक ...
संदीप मानकर /अमरावती : जिल्ह्यात ३२ ब्लॅकस्पॉटवर आतापर्यंत ९०७ अपघाताच्या घटना घडल्या. त्यात ३६२ जणांचे बळी गेले. ही धक्कादायक माहिती पोेलिसांनी प्रादेशिक परिवहन विभागाकडे सादर केलेल्या अहवालातून पुढे आली.
या अपघातांत ३२ ब्लॅकस्पॉट निश्चित झाल्यानंतर आतापर्यंत २० ब्लॅकस्पॉटची सुधारणा व उपाययोजना सार्वजनिक बांधकाम विभागाच्याावतीने करण्यात आल्याची माहिती आरटीओच्या अधिकाऱ्यांनी दिली. एकूण अपघातांत ब्लॅकस्पॉटवरसुद्धा अनेकांचे बळी गेले आहेत.
अमरावती शहर हद्दीत झालेल्या ३८५ अपघातांमध्ये ८० जणांचा मृत्यू झाला आहे. अमरावती ग्रामीण हद्दीत ५२२ अपघातांत २८२ जणांचे बळी गेले. त्यामुळे रस्ता सुरक्षा समितीने बैठक घेऊन अपघात प्रवणस्थळाला भेटी देऊन त्याची पाहणी केली. तातडीने उपायोजना करण्याचे सूचविण्यात आले होते.
सन २०१९मध्ये १०२४ अपघातात ३२१ जणांचे मृत्यू झाले होते. गत वर्षी मृत्यूची संख्या वाढली आहे.
जिल्ह्यातील ब्लॅकस्पॉट- ३२
२०२० मध्ये झालेले अपघात -९०७
अपघातातील मृत्यू- ३६२
बॉक्स
गतवर्षी अपघाताची संख्या
जानेवारी-७६
फेब्रुवारी-९०
मार्च-७५
एप्रिल -२३
मे -३८
जून -६१
जुलै-८५
ऑगस्ट -६१
सप्टेंबर -७१
ऑक्टोबर -९७
नोव्हेंबर -९८
डिसेंबर -१३२