तिघांना चिरडणाऱ्या वाहनचालकाला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:12 AM2021-07-17T04:12:05+5:302021-07-17T04:12:05+5:30
१५ जुलैला कारची दुचाकीला धडक, मोर्शी ते चांदूर बाजार मार्गावर अपघात मोर्शी : मोर्शी ते चांदूर बाजार मार्गावर असलेल्या ...
१५ जुलैला कारची दुचाकीला धडक, मोर्शी ते चांदूर बाजार मार्गावर अपघात
मोर्शी : मोर्शी ते चांदूर बाजार मार्गावर असलेल्या मधापुरीच्या हनुमान मंदिराजवळील वळण रस्त्यावर दुचाकी व कारच्या धडकेत तिघांचा मृत्यू झाला.
मोर्शी येथून अंबाडा येथे काम आटोपून एमएच २७ ...... ०१९२ क्रमांकाच्या दुचाकीने जात असलेले चिमाजी अमृत कोकरे (५०, रा. अंबाडा), सुभाजी कोंडी कासदेकर (५५, रा. मानी, तालुका आठनेर) व रामभाऊ रामू परते (४५, रा. नळा, तालुका आठनेर) या तिघांना विरुद्ध दिशेने भरधाव येणाऱ्या एमएच ३१ ई क्यू ०१९२ क्रमांकाच्या कारने जोरदार धडक दिली. यामुळे तिघेही दुचाकीवरून फेकले गेले. एकाचा पाय पूर्णपणे तुटून पडला होता, असे प्रत्यक्षदर्शीने सांगितले. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच मोर्शी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तीनही मृतकाचे शव ॲम्ब्युलन्स बोलावून मोर्शी उपजिल्हा रुग्णालयात आणले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. १६ जुलै रोजी उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृतदेहाचे शवविच्छेदन करून ते नातेवाइकांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी मोर्शी पोलिसांनी उत्तर प्रदेशातील रहिवासी असलेला चालक मोहन गुडिया याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.
------
वळण धोकादायक
यापूर्वीदेखील हनुमान मंदिराजवळील वळण रस्त्यावर अनेकदा अपघात झाले आहेत. या अपघातांमध्ये कित्येकांना आपले प्राण गमवावे लागले.