दर्यापूर आगाराचे चालक चालवतात एका पायाने बस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2018 10:19 PM2018-09-09T22:19:14+5:302018-09-09T22:20:00+5:30

राज्य परिवहन विभागाच्या दर्यापूर आगारातील चालक एका पायाने बस चालवित असल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी उघड झाला.

The driver of Daryapur road ran a bus with one foot | दर्यापूर आगाराचे चालक चालवतात एका पायाने बस

दर्यापूर आगाराचे चालक चालवतात एका पायाने बस

googlenewsNext
ठळक मुद्देप्रवाशांचा जीव टांगणीला : राज्य परिवहन कारवाई करणार काय?

चेतन घोगरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अंजनगाव सुर्जी : राज्य परिवहन विभागाच्या दर्यापूर आगारातील चालक एका पायाने बस चालवित असल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी उघड झाला.
दर्यापूर आगाराची बस क्रमांक एम एच २०-बी एफ १९३१ ही शनिवार ८ सप्टेंबर रोजी दुपारी दीड वाजता दर्यापूर निंभारीमार्गे अंजनगाव सुर्जीसाठी निघाली होती. बसमध्ये २० ते २५ प्रवासी व काही विद्यार्थी बसले होते. बस दर्यापूर शहर पार करीत अकोट दर्यापूर टी-पॉइंटवरून अंजनगाव सुर्जी मार्गावर लागताच बसचालकाने बस वेगाने चालवण्यास सुरुवात केली. रस्त्यात काही आडवे आले तर जोरात ब्रेक दाबणे, मोकळा रस्ता दिसला की भरधाव बस पळविणे, गतिरोधक आला तर वाहन हळू न चालवणे, खड्ड्यात बस आपटणे, त्यामुळे प्रवासी एकमेकांच्या अंगावर तसेच पुढील सिटवर धडकले.लेहेगाव फाटा पार करताच चालक एक पाय समोरील बफरवर ठेवून एकाच पायाने क्लच, ब्रेक, एक्सिलेटर हाताळत होता. एका हाताने स्टेअरिंगसुद्धा सांभाळताना दिसून आला. हा सर्व प्रकार काही प्रवाशांच्या लक्षात येताच त्यांच्या अंगावर शहारे येण्यास सुरुवात झाली. चालकाकडे पाहून तो नशेत असल्यासारखा दिसत होता. ही बाब महिला वाहकाच्या निदर्शनास आणून दिली असता त्यांनीसुद्धा याकडे दुर्लक्ष केले.

नादुरुस्तीस बसचालक कारणीभूत
सामान्यांसह प्रतिष्ठित व ज्येष्ठ नागरिक एसटी बसने आजही प्रवास करतात. े राज्य परिवहन महामंडळाने विविध सुविधादेखील निर्माण केल्यात. परंतु बसचालकांच्या हलगर्जीपणामुळे बसेस अचानक मध्यच बंद पडणे, टायर निकामी होणे, पत्रे उडणे आदी प्रकार घडतात. त्यामुळे एसटी महामंडळाची प्रतिमा मलीन होण्यास बसचालक कारणीभूत असल्याचे यावेळी बोलले गेले.

आगार प्रमुखासह कुणाचेच फोन लागेना
दर्यापूर बस आगारातील आगार प्रमुख इंगोले यांच्या मोबाईल वर संपर्क केला असता ते नॉट रिचेबल होते. तर बस डेपो व आगार विभागातील दूरध्वनी कोणीच उचलत नव्हते त्यामुळे सर्व पोळा सण साजरा करण्यासाठी गावी तर गेले नाहीत ना ? असा प्रश्न निर्माण झाला.

Web Title: The driver of Daryapur road ran a bus with one foot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.