झेब्रा क्रॉसिंगवर वाहनचालकांचे अतिक्रमण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:17 AM2021-09-16T04:17:08+5:302021-09-16T04:17:08+5:30

फोटो मनीषकडे पान १ लोकमत विशेष अमरावती : अपघात होऊ नये, पादचाऱ्यांना रस्ता ओलांडता यावा, यासाठी रस्त्यांवर झेब्रा क्रॉसिंग ...

Drivers encroach on Zebra Crossing! | झेब्रा क्रॉसिंगवर वाहनचालकांचे अतिक्रमण!

झेब्रा क्रॉसिंगवर वाहनचालकांचे अतिक्रमण!

googlenewsNext

फोटो मनीषकडे

पान १

लोकमत विशेष

अमरावती : अपघात होऊ नये, पादचाऱ्यांना रस्ता ओलांडता यावा, यासाठी रस्त्यांवर झेब्रा क्रॉसिंग असते. झेब्रा क्रॉसिंग पादचाऱ्यांसाठी असून ते त्यांना वापरता यावेत, अशी त्यामागील भूमिका. मात्र, त्याच भूमिकेला अमरावती शहरात छेद दिला जात आहे. झेब्रा क्रॉसिंगवर वाहने उभी करू नये, हा साधा नियमही येथे पाळला जात नसल्याचे वास्तव आहे. झेब्रा क्रॉसिंगवर स्टॉप लाईन असते. या लाईनच्या पुढे वाहन गेल्यास दंडात्मक कारवाई करणे अपेक्षित आहे.

वाहतुकीच्या समस्येवर सर्वच स्तरातून मोठ्या प्रमाणावर ओरड होताना दिसते आहे. वाहतूक पोलिसांकडून वाहनचालकांवर करण्यात येणाऱ्या कारवाईचा दंड लाखो रुपयांनी वसूल केला जातो आहे. मात्र, त्या तुलनेत वाहतूक व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी पुढाकार घेतला जात नाही. शहरातील अनेक चौक व महत्त्वपूर्ण रस्त्यांवरील झेब्रा क्रॉसिंग धूसर झाले आहेत. कुणीही वाहनचालक झेब्रा क्रॉसिंगच्या मागे वाहने उभी करत नाहीत. वाहतूक पोलीसदेखील त्यांना हटकत नाहीत. शहरातील विविध संस्था, संघटना, स्वयंसेवी संस्था, ज्येष्ठ नागरिक, कॉलेजवयीन मुले अशा अनेक लोकांकडून शहरातील सिग्नलवर लोकांना वाहतुकीचे किमान नियम पाळले जावे म्हणून प्रयत्न होताना दिसतात. मात्र, त्यालाही यश आलेले दिसत नाही.

बॉक्स

प्रत्येकाला पुढे जाण्याची घाई

सिग्नल हिरवा होण्यास अगदी दहा सेकंद उरलेले असले तरी वाहनचालक जोरात हॉर्न वाजवायला सुरुवात करतात. अनेकदा सिग्नल हिरवा होण्यापूर्वीच सिग्नल तोडून वाहनचालक पुढे निघालेले सर्रास दिसतात. स्थानिक राजकमल चौक, पंचवटी चौक, इर्विन चौक, शेगाव नाका चौक येथे हे चित्र सर्रास पाहावयास मिळते.

////////////

फूटपाथवर अतिक्रमण, मग चालायचे कुठून?

रस्त्याच्या कडेला असलेल्या फूटपाथवर अतिक्रमण करण्यात आले आहे. चौक ओलांडताना पादचाऱ्यांना अनेकदा जीव मुठीत घेऊन रस्ता क्रॉस करावा लागतो. ज्येष्ठ नागरिकांचे तर प्रचंड हाल होतात. रस्ता ओलांडताना अनेकदा झेब्रा क्रॉसिंगवर वाहने उभी करण्यात आलेली असतात. त्यात सिग्नल न पाळण्याची शर्यत लागलेली असल्यामुळे रस्ता क्रॉस करत असलेल्या लोकांवरच ओरडत वाहनचालक निघून जातात.

/////////////////////

काय आहे नियम?

झेब्रा क्रॉसिंगच्या अलीकडे असलेल्या पहिल्या लाईनवर आपले वाहन उभे करायला पाहिजे, असा नियम सांगतो. मात्र, शहरातील अनेक चौकात जेथे झेब्रा क्रॉसिंग आहे, तेथेच दुभाजक संपतो. त्यामुळे दुभाजकाच्या समांतर रेषेत वाहन लावले योग्य अशी वाहनचालकांचा गोड गैरसमज झालेला आहे.

/////////

Web Title: Drivers encroach on Zebra Crossing!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.