ग्रामीण वाहतूक पोलिसांशी वाहनचालकांची हुज्जतबाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:14 AM2021-03-08T04:14:30+5:302021-03-08T04:14:30+5:30
अमरावती : वाहतूक पोलिसांशी एक वाहनचालक हुज्जतबाजी करून मोबाईलमध्ये व्हिडीओ शुटींग केली. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा प्रकार ...
अमरावती : वाहतूक पोलिसांशी एक वाहनचालक हुज्जतबाजी करून मोबाईलमध्ये व्हिडीओ शुटींग केली. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा प्रकार खोलापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला. राज्यभरात याची चर्चा सुरू आहे. अखेर वाहतूक पोलिसांनी संबंधित वाहनचालकाला दोनशे रुपये दंड ठोठावला. त्याला चौकशीकरिता बोलाविले आहे. याप्रकरणी पोलिसांवर दादागिरीचा आरोप त्या व्हिडीओतून करण्यात आला आहे.
वाहतूक पोलिसांनी खोलापूर मार्गावर वाहन क्रमांक एमएच १७ एझेड ८२७४ ला थांबवून परवाना व दस्तावेजांची मागणी चालकास केली. त्यावेळी पोलीस व वाहनचालकात चांगलीच बाचाबाजी झाली. याचा व्हिडीओ संबंधित वाहनचालकाने मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग केला. वाहतूक पोलीस वाहनमालक का उपस्थित नाही, याबद्दल वाहनचालकाला विचारणा करीत असल्याचे व्हिडिओत दिसत आहे. परंतु वाहनमालक वाहनात असलाच पाहिजे, हे कोणत्या नियमात बसते, असा थेट प्रश्न वाहनचालक पोलिसांना करीत आहे. पोलिसांनी परवाना हिसकण्याचा प्रयत्न केल्याने परवान्याचे दस्तावेज फाटल्याचा आरोपदेखील वाहनचालक करीत होता. भर रस्त्यावरील या गोंधळाचा व्हिडीओ आता राज्यभरात व्हायरल झालेला आहे.
बॉक्स
त्या वाहनास प्रवासी वाहतुकीची परवानगी नव्हती
खोलापूर मार्गावर एका वाहनाला परवाना व दस्तावेज दाखविण्याचे वाहनचालकास म्हटले. परंतु त्याने हुज्जत घातली. नॉन ट्रान्सपोर्टचे वाहनातून प्रवासी वाहतूक सुरू असल्याचे आढळून आले. त्यामुळे त्या वाहनचालकाला दोनशे रुपयांचा दंड देण्यात आला. संबंधित वाहनचालकास चौकशीकरिता बोलाविले आहे, अशी माहिती ग्रामीण वाहतूक शाखेचे पोेलीस निरीक्षक सुनील वायदंडे यांनी दिली.