वाहनचालकांची धरपकड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2018 10:41 PM2018-06-17T22:41:24+5:302018-06-17T22:42:16+5:30
वाढत्या चेनस्नॅचिंगच्या घटनांना आळा घालण्याकरिता शहरातील नियमबाह्य वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी मोहीम पोलिसांनी सुरू केली आहे. त्यामध्ये या आठवड्यात पोलिसांनी शेकडो वाहनांची तपासणी करून ३५० पेक्षा अधिक वाहनचालकांवर एमव्ही अॅक्टनुसार धडक कारवाई केली. यामध्ये शहर कोतवाली ठाण्याच्या हद्दीत सर्वाधिक कारवाई करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : वाढत्या चेनस्नॅचिंगच्या घटनांना आळा घालण्याकरिता शहरातील नियमबाह्य वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी मोहीम पोलिसांनी सुरू केली आहे. त्यामध्ये या आठवड्यात पोलिसांनी शेकडो वाहनांची तपासणी करून ३५० पेक्षा अधिक वाहनचालकांवर एमव्ही अॅक्टनुसार धडक कारवाई केली. यामध्ये शहर कोतवाली ठाण्याच्या हद्दीत सर्वाधिक कारवाई करण्यात आली.
पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांच्या निर्देशानुसार पोलिसांनी बुधवारपासून दोन तास शहरातील विविध परिसरात नाकाबंदी केली. त्यामध्ये विनाक्रमांकाची वाहने, अवैध वाहतूक, ट्रिपल सिट, विना परवाना वाहतूक करणारे, वाहतुकीस अडथळा आणणाºया वाहनचालकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. यामध्ये बडनेरात २, फे्रजरपुºयात १२, गाडगेनगरात १२, नागपुरी गेट ५, वलगाव २, नांदगाव पेठ २, राजापेठ २३, कोतवाली २५, खोलापुरी गेट १०, भातकुली २ पूर्व वाहतूक शाखेच्या १४, पश्चिमच्या १८, गुन्हे शाखेच्या २७ अशा एकूण १५४ वाहनचालकांविरुद्ध एमव्ही अॅक्टनुसार कारवाई करण्यात आली.
विना क्रमाकांच्या ८७ वाहनांवर कारवाई
शहरात विना क्रमांकाच्या ८७ वाहनांवर कारवाई करण्यात आली. त्यामध्ये बडनेरा हद्दीत २, गाडगेनगरात ११, नांदगाव पेठ २, राजापेठ २, कोतवाली २४, खो.गे. ६, वाहतूक शाखेने २५, गुन्हे शाखेने १५ वाहनांवर कारवाई केली. विना क्रमाकांच्या कारवरही कारवाई केली
१२ आॅटोंवर कारवाई
नियमबाह्य व अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या १२ आॅटोंवर पोलिसांनी कारवाई केली. त्यामध्ये राजापेठ पोलिसांनी ८, कोतवालीत १, वाहतूक शाखेने ३ आॅटोवर कारवाई केली आहे.
ट्रिपल सीटच्या दहा कारवाया
ट्रिपल सिट वाहन चालविणाऱ्यांचे प्रमाण शहरात दिवसेंदिवस वाढत आहे. बुधवारच्या मोहिमेत पोलिसांनी १० ट्रिप्पल सिट वाहनांवर कारवाईचा बडगा उगारला. त्यात फे्रजरपुराने २, राजापेठ ४ व खोलापुरी गेटमध्ये ४ दुचाकीवर कारवाया केल्यात.
राजापेठ पोलिसांकडून सर्वाधिक प्रतिबंधात्मक कारवाया
राजापेठ पोलिसांनी १५ जूनपर्यंत ६४० आरोपींविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई केली. पोलीस आयुक्तालय हद्दीत सर्वाधिक प्रतिबंधात्मक कारवाई करणारे राजापेठ ठाणे ठरले आहे. कायदा व सुव्यस्थेच्या अनुषंगाने पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी प्रतिबंधात्मक कारवाईचा सपाटा सुरु केला. सर्व ठाणेदारांना सूचना देऊन प्रतिबंधात्मक कारवाई करण्यास सांगितले. त्यानुसार पोलीस जोमाने कामाला लागले होते. प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारांची धरपकड सुरू झाली. पोलिसांनी गुन्हेगारांविरुद्ध कलम १०७ व ११६ प्रमाणे कारवाई करून त्यांची सहायक पोलीस आयुक्तासमोर पेशी केली. यामध्ये अन्य ठाण्याच्या तुलनेत राजापेठ पोलिसांनी सर्वाधिक प्रतिबंधात्मक कारवाया केल्याचे निदर्शनास आले आहे.