अमरावतीमध्ये रामनवमीच्या शोभायात्रेतून ड्रोन कॅमेरा जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2019 09:40 PM2019-04-14T21:40:01+5:302019-04-14T21:40:35+5:30

रामनवमीच्या शोभायात्रेत ड्रोन कॅमे-याद्वारे चित्रिकरण करणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले.

Drone camera seized from Ramnavami's showroom in Amravati | अमरावतीमध्ये रामनवमीच्या शोभायात्रेतून ड्रोन कॅमेरा जप्त

अमरावतीमध्ये रामनवमीच्या शोभायात्रेतून ड्रोन कॅमेरा जप्त

Next

अमरावती - रामनवमीच्या शोभायात्रेत ड्रोन कॅमे-याद्वारे चित्रिकरण करणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले. गाडगेनगर पोलिसांनी ड्रोन कॅमेरा जप्त करून अक्षय दिलीप इंगोले (रा.पुंडलिलबाबानगर)याच्याविरुद्ध भादंविच्या कलम १८८ अन्वये शनिवारी रात्री गुन्हा नोंदविला. 

    रामनवमीनिमित्त शहरातील विविध परिसरात शोभायात्रा काढण्यात आल्या. दरम्यान कॉटन मार्केट मार्गावरून शोभायात्रा जात असताना हवेत एका ड्रोन कॅमेºयाद्वारे चित्रिकरण सुरू असल्याचे गाडगेनगर पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी ड्रोन कॅमेरा हाताळणाºया अक्षय इंगोले नामक तरुणाला परवानगीबाबत विचारणा केली असता, त्याच्याजवळ परवानगी नव्हती. त्यामुळे गाडगेनगर पोलिसांनी अक्षय इंगोलेजवळील ड्रोन कॅमेरा व त्यासोबतचे अन्य साहित्य जप्त केले. त्याच्याविरुद्ध सरकारी आदेशाचे उल्लंघन केल्याचा गुन्हा पोलिसांनी नोंदविला आहे. अशा प्रकारची जिल्ह्यातील ही पहिलीच कारवाई असून, पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक दत्ता देसाई करीत आहे. 

गुप्त वार्ता विभागाच्या आदेशाचे उल्लंघन
सध्या लोकसभा निवडणूक असल्याने व्हीआयपी व व्हीआयपीसह अनेक महत्त्वाचे राजकीय नेत्यांचे दौरे शहरात सुरू आहे. अशा स्थितीत ड्रोनचा वापर करून गुप्त वार्ता विभागाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.

नागरी उड्डाण विभागाची परवानगी आवश्यक
ड्रोन कॅमेºयाने चित्रिकरण करण्यासंबंधी नागरी उड्डाण विभागाची परवानगी घेणे आवश्यक असल्याची माहिती पोलीस निरीक्षक मनीष ठाकरे यांनी दिली. निवडणुकीच्या काळात अतिमहत्त्वाचे नेते मंडळी दौ-यावर असतात. अशा काळात ड्रोन उडविणे धोकादायक ठरू शकते.

Web Title: Drone camera seized from Ramnavami's showroom in Amravati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.