व्याघ्र प्रकल्पाच्या ड्रोन कॅमेऱ्याची मेळघाटातील स्त्रियांमध्ये वेगळीच दहशत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2020 07:38 PM2020-05-23T19:38:39+5:302020-05-23T19:40:12+5:30
मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचा सिपना वन्यजीव विभागांतर्गत येणाऱ्या सेमाडोह गावावर मागील काही महिन्यांपासून ड्रोन कॅमेऱ्याने सतत चित्रीकरण दिवसातून चार वेळा केले जात आहे, अशा महिला भगिनींना स्नानगृहासह इतर स्वातंत्र्य हिरावले असून, ड्रोनची दहशत निर्माण झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचा सिपना वन्यजीव विभागांतर्गत येणाऱ्या सेमाडोह गावावर मागील काही महिन्यांपासून ड्रोन कॅमेऱ्याने सतत चित्रीकरण दिवसातून चार वेळा केले जात आहे, अशा महिला भगिनींना स्नानगृहासह इतर स्वातंत्र्य हिरावले असून, ड्रोनची दहशत निर्माण झाली आहे. तक्रार करूनही अधिकारी ऐकत नसल्याने सोमवारी खासदार नवनीत राणा यांच्या पुढे नागरिकांसह महिलांनी आपली व्यथा मांडली सोबतच व्याकरण प्रकल्पाचा नाका हटविणे मजुरांचे अडकलेले वेतन आदी विविध समस्या मांडल्या
व्याघ्र प्रकल्पाच्या वतीने गावावर दिवसातून तीन ते चार वेळा मनात येईल तसा ड्रोन कॅमेरा फिरविण्यात येतो गावातील अनेक घरांमध्ये असलेल्या स्नानगृहवर छत नाही. त्यामुळे महिलांमध्ये या ड्रोन कॅमेराची दहशत निर्माण झाली आहे, तो कॅमेरा कशासाठी फिरवण्यात येतो याचे उत्तर व्याघ्र प्रकल्पाचे अधिकारी देत नसून केवळ दहशत निर्माण करण्यासाठी हा प्रकार सुरू असल्याचे सोमवारी एका लेखी निवेदनात खासदार नवनीत राणा यांना सेमाडोह येथे गावकऱ्यांनी सांगितले. व्याघ्र प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांची चिथावणीखोर वागणूक नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणारी ठरत आहे. यासंदर्भात भाजपच्या जिल्हा परिषद सदस्य सुनंदा काकड यांच्यासह लाला मावस्कर मोतीराम मावस्कर, ठुनू धिकार, चिताराम मावस्कर, लाला काकडे, लच्छू कासदेकर, रामाजी बेलकर अनिल सराटे अशा जवळपास अडीचशे पेक्षा अधिक गावकऱ्यांच्या स्वाक्षरीचे निवेदन खा. राणा यांना देण्यात आले.