दुष्काळग्रस्त भागात थेंब-थेंब पाण्यासाठी 'ती'ची धडपड

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2019 10:18 PM2019-05-11T22:18:39+5:302019-05-11T22:19:55+5:30

घराघरांत शोषखड्डे : राज्यातील पहिला प्रयोग धामणगावात

in drought areas She fight for every drop of water | दुष्काळग्रस्त भागात थेंब-थेंब पाण्यासाठी 'ती'ची धडपड

दुष्काळग्रस्त भागात थेंब-थेंब पाण्यासाठी 'ती'ची धडपड

googlenewsNext

मोहन राऊत/धामणगाव रेल्वे (अमरावती) : तीन वर्षांपासून पडणारा अल्प पाऊस, त्यातून पाण्यासाठी होणारी भटकंती पाहता पाण्याचा प्रत्येक थेंब वाचविण्यासाठी राज्यात लोकमत सखी मंचने पुढाकार घेतला आहे. त्याचा पहिला प्रयोग धामणगाव शहरातील लोकमत सखी मंचच्या विभागप्रमुखांनी यशस्वी केला. शहरातील एक हजार सखींच्या घरी शोषखड्ड्याच्या कामाला सुरुवात झाली आहे.

 
अलीकडच्या काळात राज्याच्या विविध भागांत कोरडा दुष्काळ पडू लागला आहे. भूगर्भातील पाणीपातळी झपाट्याने कमी होत असल्याने पाणीसंकट अधिक तीव्र बनले आहे. जलसंधारण व जलसंवर्धनाची ‘अभी नही तो कभी नही’ अशा स्थिती आलेली आहे. आगामी काही वर्षांत राज्यात सर्वदूर पाणीसंकट उद्भवण्याची भीती अस्वस्थ वर्तमानातून प्रतिबिंबित होत आहे. त्यावर मात करण्यासाठी घरच्या घरी शोषखड्ड्यांची निर्मिती करून जलसंधारणास हातभार लावण्याची सुरुवात धामणगावातून करण्यात आली. पावसाळ्यात पडणाºया पावसाचा थेंब न् थेंब जमिनीत झिरपावा, यासाठी दररोज वापरण्यात येणारे पाणी तसेच पावसाळ्यात स्लॅबवरून खाली येणारे पाणी पाइप टाकून थेट शोषखड्ड्यात सोडण्यात येणार आहे. शहरातील एक हजार सखींकडे हा प्रयोग राबविण्यात येणार असल्याचे त्या म्हणाल्या. 

भूजल पुनर्भरणासाठी 
पावसाचा प्रत्येक थेंब व दररोजचे वापरलेले पाणी जमिनीत मुरावे म्हणून येथील लोकमत सखी मंच विभागप्रमुख सविता मेंडुले यांनी प्रथम स्वत:च्या घरी शोष खड्डा तयार केला. घरातील स्वयंपाकगृह, स्नानगृह व अन्य सांडपाणी घराबाहेर सोडून न देता ते घराच्या अंगणात शोषखड्डा करून त्यात मुरविण्याचे काम त्यांनी सुरू केले आहे.  आपल्या घरातून दिवसाकाठी दरडोई २० लिटर पाणी सांडपाणी म्हणून नालीतून सोडण्यात येते. घरी शोषखड्डा तयार केल्यानंतर त्यांनी सर्व सखी सदस्यांना याबाबत माहिती दिली.

Web Title: in drought areas She fight for every drop of water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.