दुष्काळी ३,४२७ गावांसाठी ७४१ कोटींची मागणी, आठ लाख शेतकरी बाधित

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2019 05:23 PM2019-07-25T17:23:27+5:302019-07-25T17:24:03+5:30

आठ लाख शेतकरी बाधित : पश्चिम विदर्भातील कमी पैसेवारीच्या गावांना ‘एनडीआरएफ’चा निधी

Drought demanded Rs 5 crore for 8 villages, 8 lakh farmers were affected in vidarbh | दुष्काळी ३,४२७ गावांसाठी ७४१ कोटींची मागणी, आठ लाख शेतकरी बाधित

दुष्काळी ३,४२७ गावांसाठी ७४१ कोटींची मागणी, आठ लाख शेतकरी बाधित

Next
ठळक मुद्देआठ लाख शेतकरी बाधित : पश्चिम विदर्भातील कमी पैसेवारीच्या गावांना ‘एनडीआरएफ’चा निधी

अमरावती : मागील वर्षी कमी पैसेवारीमुळे दुष्काळस्थिती जाहीर झालेल्या मदतीपासून वंचित ३,४२७ गावांसाठी ७४१ कोटी ३ लाख ४३ हजार रुपयांची मागणी गुरुवारी विभागीय आयुक्तांनी शासनाकडे केली. पश्चिम विदर्भात जिरायती व बागायती अशा ७ लाख ८९ हजार ७०५ शेतकऱ्यांना बाधित १० लाख २७ हजार ६३७ हेक्टरसाठी सदर मागणी करण्यात आलेली आहे.

दुष्काळ व्यवस्थापन संहितेच्या निकषानुसार विभागातील २४ तालुक्यांना कमी पावसाचा ट्रिगर लागू झाल्याने निकषानुसार दुष्काळ जाहीर करण्यात आला व याच तालुक्यांना ‘एनडीआरएफ’च्या निकषानुसार दोन हेक्टरच्या मर्यादेत जिरायती शेतीसाठी ६,८०० रुपये प्रतिहेक्टर व बागायती शेतीसाठी १८,००० रुपये या निकषाप्रमाणे मदत देण्यात आली.

शासनाने ८ जानेवारी २०१९ रोजी पुन्हा पावसाचा खंड या निर्देशांकान्वये अमरावती विभागातील ४७ महसूल मंडळात दुष्काळस्थिती जाहीर केली व या गावांना दुष्काळाच्या आठ सवलती जाहीर केल्यात. मात्र, मदतनिधी दिला नव्हता. त्यानंतर २१ फेब्रुवारी २०१९ रोजीच्या पत्राद्वारे ५० पेक्षा कमी पैसेवारी असलेल्या गावांना दुष्ष्काळाच्या सवलती जाहीर केल्या. मात्र, ही सर्व गावे मदतनिधीपासून वंचित राहिली. त्यामुळे २९ जून २०१९ च्या पत्रान्वये महसूल विभागाच्या उपसचिवांनी दुष्काळ मदत निधीपासून वंचित गावांसाठी आवश्यक निधीच्या मागणीचे पत्र विभागीय आयुक्तांना पत्र दिले. त्यानुसार विभागीय आयुक्त पीयूष सिंग यांनी २५ जुलै रोजी ७४१ कोटींची मागणी शासनाकडे नोंदविली आहे. यंदा कमी पावसामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली असताना गतवर्षीचा दुष्काळनिधी मिळण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
 

बागायती क्षेत्रासाठी हवेत ६७.८८ कोटी
पश्चिम विदर्भात ३२ हजार २६७ शेतकºयांच्या बागायती ३७ हजार ७१५ हेक्टर क्षेत्रात झालेल्या नुकसानीसाठी प्रतिहेक्टर १८ हजार रुपयांप्रमाणे ६७.८८ कोटींची मागणी करण्यात आली. यामध्ये अमरावती जिल्ह्याला ४६.५५ कोटी, अकोला जिल्ह्यात ११.२१ कोटी, यवतमाळ जिल्ह्यात ६.९४ कोटी, बुलडाणा जिल्ह्यात २.९६ कोटी, तर वाशीम जिल्ह्यात १९.९८ लाख रुपयांची आवश्यकता आहे. दोन हेक्टर मर्यादेतच ही मदत मिळणार आहे.
बॉक्स

जिरायती शेतीसाठी जिल्हानिहाय मागणी (कोटी)
जिल्हा         गावे    शेतकरी    क्षेत्र    मदत
अमरावती    १०५७    २६८०८६    ३७३७२३    २५४.१३
अकोला     २६१    ७६४२१    ९७८९९    ६६.५७
यवतमाळ    १४८४    १८८३१०    ३०२०१९    २०५.३७
बुलडाणा    ५८६    २१२६८९    २००२७२    १३६.१८
वाशीम    ३९    ११९३२    १६००८    १०.८८
एकूण        ३४२७    ७५७४३८    ९८९९२१    ६७३.१४
 

Web Title: Drought demanded Rs 5 crore for 8 villages, 8 lakh farmers were affected in vidarbh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.