दुष्काळी अनुदानाचा ४० हजार २४४ शेतकऱ्यांना होणार लाभ
By admin | Published: January 18, 2015 10:29 PM2015-01-18T22:29:17+5:302015-01-18T22:29:17+5:30
वरुड तालुक्यात पावसाने दडी मारल्याने खरीप पिके बाधित झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले असून मृग बहराचीही फूट झाली नाही. त्यामुळे शेतकरी हवालदील झाला होता. शासनाने
वरूड : वरुड तालुक्यात पावसाने दडी मारल्याने खरीप पिके बाधित झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले असून मृग बहराचीही फूट झाली नाही. त्यामुळे शेतकरी हवालदील झाला होता. शासनाने सन २०१४ च्या खरीप हंगामातील बाधित पिकांच्या अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांना पुढील आठवड्यात देण्यात येणार आहे. यामध्ये ४० हजार २४४ लाभार्थी शेतकरी संख्या असून पहिल्या टप्पयातील १२ कोटी ७७ लाख ८ हजार रुपयांची रक्कम वाटप होणार आहे.
खरीप हंगामात अपुऱ्या पावसामुळे विभागातील शेतकऱ्यांचे पीक उद्ध्वस्त झाले होते. नुकसान झालेल्या शेताचा शासनाच्यावतीने सर्वेक्षण करण्यात आले. जिरायती पिकासाठी ४ हजार ५०० रुपये प्रति हेक्टर, बागायती क्षेत्रासाठी ९ हजार रुपये तर संत्रा आणि फळपिकासाठी १२ हजार रुपये प्रतिहेक्टरी मदत जाहीर करण्यात आली होती. ही रक्कम अमरावती जिल्ह्यातील १४ तालुक्यांसाठी १२५ कोटी ७९ लाख रुपये प्राप्त झाले. यामध्ये अमरावती तालुक्यासाठी ८ कोटी ९७ लाख ५४ हजार रुपये, भातकुली तालुका ७ कोटी ९९ लाख १९ हजार रुपये, तिवसा तालुका ६ कोटी ५७ लाख ५५ हजार रुपये, चांदूररेरल्वे तालुका ६ कोटी ३३ लाख ८ हजार रुपये, धामणगाव रेल्वे तालुका ७ कोटी ७७ लाख ७१ हजार रुपये, नांदगाव खंडेश्वर तालुका १० कोटी ५२ लाख ५० हजार रुपये, दर्यापूर तालुका ११ कोटी ३९ लाख ६२ हजार रुपये, अंजनगाव तालुका ६ कोटी ५१ लाख १६ हजार रुपये, अचलपूर तालुका १२ कोटी १० लाख ३२ हजार रुपये, चांदूरबाजार तालुका १२ कोटी ५ लाख ४८ हजार रुपये, मोर्शी तालुका ११ कोटी ९६ लाख ६१ हजार रुपये, धारणी तालुका ६ कोटी ६६ लाख ४२ हजार रुपये, चिखलदरा तालुका ४ कोटी १४ लाख ७४ हजार रुपये मदत वाटप होणार आहे. यामध्ये खरीप हंगामातील बाधित शेतकऱ्यांना सर्वाधिक मदत वरुड तालुक्यात ४० हजार २४४ लाभार्थी शेतकऱ्यांना १२ कोटी ७७ लाख ८ हजार रुपये मिळणार असल्याचे तहसीलदार राम लंके यांनी सांगितले. ही मदत २६ जानेवारीपर्यंत वाटप करण्यात येणार आहे. तालुक्यातील बाधित शेतकऱ्यांसाठी तहसीलदार यांनी २९ कोटी २३ लाख ९० हजार ४२० रुपयाची मागणी केली असून दुसरा प्राप्त होणार आहे. (तालुका प्रतिनिधी)