डरकाळी फोडत वाघाने जंगलात ठोकली धूम, अमरावती जिल्ह्यात घालत होता धुमाकूळ

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2019 06:29 AM2019-02-04T06:29:31+5:302019-02-04T06:30:56+5:30

चंद्रपूरच्या थर्मल पॉवर स्टेशन परिसरात जन्मलेल्या व अमरावती जिल्ह्यात सतत महिनाभर धुमाकूळ घालणाऱ्या अडीच वर्षीय वाघाला महिनाभर पिंजºयात ठेवले होते.

The drumming tigers in the forest were shaking in the forest, in the Amravati district | डरकाळी फोडत वाघाने जंगलात ठोकली धूम, अमरावती जिल्ह्यात घालत होता धुमाकूळ

डरकाळी फोडत वाघाने जंगलात ठोकली धूम, अमरावती जिल्ह्यात घालत होता धुमाकूळ

Next

- नरेंद्र जावरे
परतवाडा (अमरावती) - चंद्रपूरच्या थर्मल पॉवर स्टेशन परिसरात जन्मलेल्या व अमरावती जिल्ह्यात सतत महिनाभर धुमाकूळ घालणाऱ्या अडीच वर्षीय वाघाला महिनाभर पिंज-यात ठेवले होते. मध्य प्रदेश व्याघ्र प्रकल्पाच्या अधिकाºयांनी सातपुडा टायगर रिझर्वच्या बोरी परिक्षेत्रात शुक्रवारी सायंकाळी सोडले.
पिंजºयाचे दार उघडताच बाहेर येत डरकाळी फोडत त्याने जंगलात धूम ठोकली. त्याच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवण्यासाठी कॉलर आयडी लावण्यात आला आहे. दहा दिवसांपासून एसटीआर वनविभागाच्या पथकाने लक्ष ठेवत चार हत्ती, तीन जेसीबी व दीडशे अधिकारी-कर्मचाºयांच्या सहाय्याने मेगा आॅपरेशन राबवित ट्रँक्यूलाईज्ड करून त्याला पकडले होते. त्यानंतर कान्हा नॅशनल पार्कमध्ये ठेवले होते. महिन्याभरानंतर त्याला जंगलात सोडण्यात आले. अमरावती जिल्ह्यात या वाघाने दोन शेतकºयांना ठार केले होते. मध्य प्रदेशात त्याने ४० पेक्षा अधिक गुरांचा फडशा पाडला होता.

Web Title: The drumming tigers in the forest were shaking in the forest, in the Amravati district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.