मद्यधुंद कारचालकाचा बेदरकारपणा

By admin | Published: February 15, 2016 12:34 AM2016-02-15T00:34:29+5:302016-02-15T00:34:29+5:30

अपूर्वा देऊळगावकरच्या मृत्यूची शाई वाळते न वाळतेच रविवारी पुन्हा एका वाहनचालकाचा बेदरकारपणा अमरावतीकरांना अनुभवायला मिळाला.

Drunkenness of drunk driver | मद्यधुंद कारचालकाचा बेदरकारपणा

मद्यधुंद कारचालकाचा बेदरकारपणा

Next

चारचाकी पार्किंगमध्ये शिरली : प्रकरण दडपण्याचा प्रयत्न
अमरावती : अपूर्वा देऊळगावकरच्या मृत्यूची शाई वाळते न वाळतेच रविवारी पुन्हा एका वाहनचालकाचा बेदरकारपणा अमरावतीकरांना अनुभवायला मिळाला. या मद्यधुंद वाहनचालकाने आपले चारचाकी वाहन थेट दुचाकीच्या पार्किंगमध्ये घातले. या अपघातात चार ते पाच दुचाकींचे नुकसान झाले आहे. दुचाकींमुळे समोरील दुकानाचे मोठे नुकसान टळले. चारचाकी वाहनाचा अग्रभाग चकनाचुर झाला.
रविवारी सायंकाळी ६.१५ च्या सुमारास इर्वीन चौकातील हॉटेलला लागून असलेल्या एका फ्लावर शापीसमोर हा अपघात घडला. याप्रकरणी शहर कोतवाली पोलिसांनी आशिष बळीराम लुल्ला (३८, रा. लुल्ला लाईन, रामपुरी कॅम्प) या चालकाला ताब्यात घेतले आहे.
दरम्यान झालेले नुकसान भरुन देण्यासाठी आम्ही तयार आहोत.

पोलीस कर्मचाऱ्याची शिष्टाई
अमरावती : गुन्हे दाखल न करता सोडून द्या, अशी विनंती करण्यसाठी एका बड्या विधिज्ञासह समाजबांधव धावले. सुमारे तासभर तक्रारकर्त्याचे मन वळविण्याचा प्रयत्न झाला. यात काही पोलीस कर्मचाऱ्यांनी हिरीरीने भाग घेतला. तक्रार केल्यास नुकसान भरपाई मिळेलच असे नाही, त्यामुळे तक्रार न करता नुकसानभरपाई घेऊन घ्या, असा अनाहुत सल्ला त्या पोलीस कर्मचाऱ्याने तक्रारकर्त्या तरुणाला दिला. ही शिष्टाई सुरू असतानाच पोलीस निरीक्षक राधेश्याम शर्मा यांनी आशिष लुल्ला याला वैद्यकीय चाचणीसाठी पाठविण्याचे निर्देश दिले. वृत्त लिहेस्तोवर कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरु होती.
तरुण पोहोचले ठाण्यात
आशिष लुल्ला हा एम.एच.२७/बीई-२३७४ या चारचाकी वाहनाने इर्विन चौकाकडून मोर्शी रोडवर येत असताना ही चारचाकी हॉटेलला लागून असलेल्या फ्लॉवर शॉपीसमोर असलेल्या दुचाकींच्या पार्किंग स्थळी शिरली. यात पठाण चौकातील अब्दुल कलीम अ. सलीम यांची एम.एच.२७/एझेड ९९३१ या दुचाकीसह अन्य ४ दुचाकीचे मोठे नुकसान झाले. अ. कलीम यांच्यासह अन्य दुचाकीचा एकही शहर कोतवालीत तक्रार करण्यासाठी पोहोचले.

मोठा अनर्थ टळला
ही कार भरधाव वेगात दुचाकीच्या पार्किंगवर आदळली. दुचाकी आडव्या असल्यानेच फुलाच्या दुकानाचे संभाव्य नुकसान टळले. या ठिकाणी दुचाकीची रांग नसती तर ही भरधाव कार त्या दुकानात शिरुन वित्तहानीसह प्राणहाणीची शक्यता नाकारता येत नव्हती. विशेष म्हणजे कारमधून उतरुन आशिष लुल्ला याने पळून जाण्याचा प्रयत्नही केला. मात्र काही प्रत्यक्षदर्र्शींनी त्याचा पाठलाग करुन त्याला आयटीआयच्या बोळीमध्ये पकडले.

Web Title: Drunkenness of drunk driver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.