सुकळी डंपिंग यार्ड धुमसतच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2018 10:02 PM2018-04-21T22:02:21+5:302018-04-21T22:02:37+5:30

उन्हाळ्याला प्रारंभ होताच नजीकच्या सुकळी कंपोस्ट डेपोला आग लागण्यास सुरूवात झाली असून, मागील पंधरवड्यात आग लागल्याने आजूबाजूच्या परिसरात धुराचे लोट होते. ती आग आटोक्यात आली असली तरी अजूनही येथील एका भागात आग धुमसतच आहे. या आगीच्या घटनेला मनपा प्रशासनाने दुजोरा दिला आहे.

The dry dumping yard | सुकळी डंपिंग यार्ड धुमसतच

सुकळी डंपिंग यार्ड धुमसतच

Next
ठळक मुद्देआरोग्य धोक्यात : घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प अनिवार्य

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : उन्हाळ्याला प्रारंभ होताच नजीकच्या सुकळी कंपोस्ट डेपोला आग लागण्यास सुरूवात झाली असून, मागील पंधरवड्यात आग लागल्याने आजूबाजूच्या परिसरात धुराचे लोट होते. ती आग आटोक्यात आली असली तरी अजूनही येथील एका भागात आग धुमसतच आहे. या आगीच्या घटनेला मनपा प्रशासनाने दुजोरा दिला आहे.
शहरातील संपूर्ण कचरा सुकळी डम्पिंग यार्डमध्ये साठवला जातो. मागील १५ दिवसांपासून येथे आगीच्या तुरळक घटना घडत आहे. या आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन दलाला यश येते. मात्र, डम्पिंग यार्डवरील कचऱ्यातील मिथेन वायूशी उन्हाचा वारंवार संपर्क येऊन पुन्हा आग लागत असल्याने प्रशासनासमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. वारंवार लागणाºया या आगीमुळे या भागातील रहिवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. आगीसोबत बाहेर पसरणाºया धुराचा परिसरातील नागरिकांना श्वसनाचे विकार जाणवू लागले आहेत.
शहरातून दररोज निघणारा २०० टन कचरा सुकळी स्थित ९.३८ हेक्टरवर पसरलेल्या कम्पोस्ट डेपोत विना प्रक्रिया साठविला जातो. तेथील दुर्गंधीमुळे सुकळी, रसुलपूर या ग्रामस्थांना प्रचंड त्रास होत असताना आगीच्या घटनांमुळे त्यात भर पडली आहे. औरंगाबादप्रमाणे सुकळी येथील ग्रामस्थांचाही येथे कचरा टाकण्यास विरोध होत असून, आगीच्या घटनांमुळे व ती आग पंधरा दिवसांपासून धुमसत असल्याने असंतोष वाढू लागला आहे. त्यावर प्रशासनाने तातडीने बैठक घेऊन उपाययोजना चालविल्या आहेत.

प्रशासनाच्या उपाययोजना
कंपोस्ट डेपोत वेळोवेळी लागत असलेल्या आगी विझविण्याकरिता अग्निशमन विभागाचे एक वाहन कायमस्वरूपी सकाळी ८ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत तेथे ठेवण्यात आले आहे. आग नियंत्रणाची जबाबदारी स्वास्थ्य निरीक्षक किशोर संगेले यांच्याकडे देण्यात आली. जुन्या बोअरवेलची दुरुस्ती व नवीन बोअरवेल तयार करण्यात येणार आहे. नजीकच्या शेतातील विहिरीचे पाणी आग विझविण्याकरिता घेण्याच्या सूचना आयुक्त पवारांनी केल्या आहेत.
का पेटतो कचरा?
मागील अनेक वर्षांपासून सुकळी कंपोस्ट डेपोत सात ते आठ लाख टन कचरा विनाप्रक्रिया पडला आहे. ७० ते ८० फूट थराचा हा कचरा मिथेन वायूमुळे पेट घेतो. उन्हात कचरा तापतो; त्यात कचºयामुळे निर्माण होणारा मिथेन वायू पेट घेतो. यामुळे आगी लागण्याच्या घटना घडतात.

Web Title: The dry dumping yard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.