दिया सिंचन योजना टाकणार कात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2018 11:22 PM2018-01-06T23:22:34+5:302018-01-06T23:23:05+5:30
मेळघाटातील दारिद्र्य रेषेखालील कुटुंबीयांना या महिन्याच्या अखेरीस विशेष भेट मिळणार आहे.
आॅनलाईन लोकमत
धारणी : मेळघाटातील दारिद्र्य रेषेखालील कुटुंबीयांना या महिन्याच्या अखेरीस विशेष भेट मिळणार आहे. या गरीब अल्पभूधारक कोरडवाहू शेतकºयांच्या जीवनात आर्थिक क्रांती घडविण्यासाठी उपसा सिंचन योजनेला सौर ऊर्जेची साथ देण्यात येत आहे. राज्यातील पहिल्या या अभिनव योजनेचा मानकरी तालुक्यातील दिया गाव ठरला आहे.
या योजनेंतर्गत सिपना नदीच्या काठावरील टेकडीवर मातीबांध पूर्ण झाले आहे. या बंधाऱ्यात सिपना नदीवरील उपसा सिंचन योजनेवर सौर ऊर्जेच्या माध्यमातून पाणी उपसण्याचा सरकारचा मानस आहे. यासाठी जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता रमेश ढवळे आणि कार्यकारी अभियंता क्षीरसागर हे लक्ष ठेवून आहेत. याच महत्त्वाकांक्षी योजनेच्या कार्याचा आढावा घेण्यासाठी वभागीय आयुक्त पीयूष सिंह व जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी प्रकल्पस्थळाला भेट दिली. यावेळी उपविभागीय अधिकारी विजय राठोड, तहसीलदार संगमेश कोडे, बीडीओ उमेश देशमुख, कृषि अधिकारी आदी उपस्थित होते.