१९५० पासून सातव्यांदा जून कोरडा

By admin | Published: July 2, 2014 11:08 PM2014-07-02T23:08:28+5:302014-07-02T23:08:28+5:30

रोहिणी, मृग व आर्द्रा नक्षत्र कोरडे गेल्याने खरीप २०१४ च्या पेरण्या पावसाअभावी रखडल्या आहेत. तूर्तास आठवडाभर तरी पावसाची शक्यता नाही. सन १९५० पासूनचा आढावा घेतला असता मान्सून लांबण्याची ही सातवी

Dry June from 1950 onwards to seventh | १९५० पासून सातव्यांदा जून कोरडा

१९५० पासून सातव्यांदा जून कोरडा

Next

गजानन मोहोड - अमरावती
रोहिणी, मृग व आर्द्रा नक्षत्र कोरडे गेल्याने खरीप २०१४ च्या पेरण्या पावसाअभावी रखडल्या आहेत. तूर्तास आठवडाभर तरी पावसाची शक्यता नाही. सन १९५० पासूनचा आढावा घेतला असता मान्सून लांबण्याची ही सातवी वेळ आहे. साधारणपणे कितीही उशीर झाला तरी जून अखेर किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात पेरणी व्हायला हवी. तूर्तास तशी शक्यता दिसत नसल्याने खरीप पिकांच्या सरासरी उत्पन्नात घट येण्याची शक्यता आहे.
यापूर्वी १९५१, १९५५, १९६५, १९७२, १९८७, २००९ व आता २०१४ मध्ये जून महिना कोरडा गेला. गेल्या ६४ वर्षांत सातव्यांदा जून महिना कोरडा गेल्याचे चित्र आहे. याचा थेट परिणाम खरिपाच्या पेरणीवर झाला आहे. जिल्ह्यात खरिपाच्या ७,०२,००० क्षेत्रांपैकी १० टक्के क्षेत्रात पेरणी झाली आहे. यामध्येही सिंचनाची सुविधा असणाऱ्या क्षेत्रात पेरण्या झाल्या आहेत. जिल्ह्यात प्रामुख्याने २० ते २५ जूनदरम्यान दरवर्षी पेरण्या आटोपतात. परंतु यंदा पावसाने दडी दिल्याने उत्पादन प्रभावित होण्याची चिन्हे आहेत.

Web Title: Dry June from 1950 onwards to seventh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.