सिमेंट चौपदरीकरणामुळे मेळघाटचे वनक्षेत्र पोखरणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2018 10:23 PM2018-12-04T22:23:02+5:302018-12-04T22:23:40+5:30

विदर्भाचे नंदनवन असलेल्या मेळघाटातील चिखलदरा येथे जाण्यासाठी चौपदरीकरण सिमेंटचा रस्ता होणार आहे. यात हा रस्ता निर्मितीसाठी जवळपास २ लाख वृक्ष आणि शेकडो हेक्टर वनक्षेत्र बाधित होणार आहे. हे चौपदरीकरण घटांगमार्गे होत असल्याने ५७.५७ किमीचा रस्ता हा वनक्षेत्रात येणार आहे. याबाबत केंद्र सरकारने अधिसूचना जारी केली आहे.

Due to cemented four-laning, the forest area of ​​Melghat will be covered | सिमेंट चौपदरीकरणामुळे मेळघाटचे वनक्षेत्र पोखरणार

सिमेंट चौपदरीकरणामुळे मेळघाटचे वनक्षेत्र पोखरणार

googlenewsNext
ठळक मुद्देकेंद्र सरकारची अधिसूचना जारी : ५८ कि.मी.च्या रस्त्यासाठी हजारो हेक्टर वनजमिनीवर घाला

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : विदर्भाचे नंदनवन असलेल्या मेळघाटातील चिखलदरा येथे जाण्यासाठी चौपदरीकरण सिमेंटचा रस्ता होणार आहे. यात हा रस्ता निर्मितीसाठी जवळपास २ लाख वृक्ष आणि शेकडो हेक्टर वनक्षेत्र बाधित होणार आहे. हे चौपदरीकरण घटांगमार्गे होत असल्याने ५७.५७ किमीचा रस्ता हा वनक्षेत्रात येणार आहे. याबाबत केंद्र सरकारने अधिसूचना जारी केली आहे.
केंद्रीय रस्ते व दळणवळण मंत्रालयाने अमरावती जिल्ह्यात वलगाव, दर्यापूर, अंजनगाव ते दर्यापूर, अमरावती ते मार्डी, आर्वी, मोर्शी ते सालबर्डी आणि आसरा, भातकुली आणि परतवाडा ते घटांगमार्गे चिखलदरापर्यंत एकूण २०० कि.मी. लांबीचे रस्ते चौपदरीकरण करण्यास मंजुरी दिलेली असून, सार्वजनिक बांधकाम विभागाने मुंबईच्या एका खासगी कंपनीला सिमेंट रस्ते बनविण्याचे कंत्राट सोपविले आहे. यासाठी या कंपनीने रस्त्यांचे सीमांकन सुरू केलेले आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या शेतातील काही भाग जाणार असून विशेषत: परतवाडा ते घटांग मार्गे होणार चिखलदरा रस्त्यासाठी वनक्षेत्र बाधीत होणार आहे.
५७.५७ किमीच्या रस्ता चौपदरीकरणामध्ये परतवाडा ते गौरखेडापर्यंत वनक्षेत्र येत नसले तरी पुढे ५० किलोमीटर वनक्षेत्र रस्त्यासाठी बाधित होणार आहे. कारण यासाठी १० हजार हेक्टरच्यावर वनक्षेत्र संपणार असल्याचा अंदाज आहे. याशिवाय सागवान वनक्षेत्र संपणार असल्याचा अंदाज आहे. सागवान व इतर प्रजातीचे मोठमोठी २ लाखांच्याच्या वर वृक्ष कोसळणार असल्याने मेळघाट व्याघ्र प्रकल्पाला धक्का बसणार आहे.
भोपाळवरून मिळणार मंजुरी
पेंच व्याघ्र प्रकल्पातून तयार करण्यात आलेल्या मार्गाप्रमाणे मेळघाट चिखलदरा चौपदरीकरण रस्ता तयार करण्यासाठी किती वनक्षेत्र संपणार आहे. यासाठी मध्यप्रदेशातील भोपाळ येथून सिमेंट काँक्रिटीकरण चौपदीकरण रस्त्यास मंजुरी मिळाल्यावर काम चालू होणार असल्याची माहिती आहे.
वलगाव ते दर्यापूर मार्गावरील ५० हजार झाडे होणार नामशेष
सन- २०१० मध्ये सामाजिक वनीकरण विभागाने वलगाव ते दर्यापूर मार्र्गावर २५ हजार वृक्ष लागवड करुन ती जगविली. चोख संगोपन आणि देखभालीमुळे आजमितीला ही झाडे डौलदारपणे उभी असताना हा रस्ता आता चौपदीकरण केला जाणार आहे. सिमेंट चौपदीकरणामुळे वनविभागासह सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालकीचे सुमारे ५० हजार झाडे तोडली जातील, असा प्राथमिक अंदाज आहे. त्यामुळे हा निर्णय निसर्गावर घाला घालणारा ठरेल, यात दुमत नाही.
पोहरा ते मालखेड रस्त्याचे सर्वेक्षण
अमरावती ते धामणगाव रेल्वे या दरम्यान सिमेंट रस्ता चौपदरीकरण केले जाणार आहे. त्याअनुषंगाने पोहरा ते मालखेड वनक्षेत्र, खासगी जमीन रस्ता निर्मितीत किती जागा हस्तांतरित करावी लागेल, याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने सर्वेक्षण सुरू केले असून, प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविला जाईल.

चौपदरीकरणामुळे जंगलाची कनेक्टिव्हीटी तुटणार असून, वन्यप्राण्यांसाठी ते धोकादायक ठरणारे आहे. विकास झाला पाहिजे पण, अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करून रस्त्यांना अंडर, ओव्हर पासेस निर्माण व्हावे. जेणेकरुन जंगल आणि वन्यजीव सुरक्षित असतील.
- जयंत वडतकर, एनजीओ, अमरावती

Web Title: Due to cemented four-laning, the forest area of ​​Melghat will be covered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.