चौफेर नाकाबंदीमुळे शेतकऱ्यांचा संप उग्र

By admin | Published: June 11, 2017 12:02 AM2017-06-11T00:02:30+5:302017-06-11T00:02:30+5:30

देशातील सत्ताधिशांनी शेतकऱ्यांची चौफेर नाकाबंदी केली आहे. सरकार बदलले. मात्र, शेतकऱ्यांची स्थिती तशीच विदारक राहिली.

Due to Chaupar blockade farmers' aggravated fatigue | चौफेर नाकाबंदीमुळे शेतकऱ्यांचा संप उग्र

चौफेर नाकाबंदीमुळे शेतकऱ्यांचा संप उग्र

Next

बच्चू कडू : मुख्यमंत्री वायफळ बोलत असल्याची टीका
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : देशातील सत्ताधिशांनी शेतकऱ्यांची चौफेर नाकाबंदी केली आहे. सरकार बदलले. मात्र, शेतकऱ्यांची स्थिती तशीच विदारक राहिली. त्या असंतोषातून शेतकऱ्यांनी स्वयंस्फुर्तीने आंदोलन पुकारले आहे. शासनाने रविवारी तोडगा न काढल्यास १२ आणि १३ जूनचे आंदोलन अधिक उग्र स्वरुपाचे असेल, असा इशारा आ. बच्चू कडू यांनी दिला. मुख्यमंत्री वायफळ बोलत असल्याची टीका त्यांनी केली.

न भूतो न भविष्यती संप
अमरावती : पक्ष कार्यकर्ते शेतकरी नाहीत का? असा सवाल आ. बच्चू कडू यांनी मुख्यमंत्र्यांना उद्देशून केला.
शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमिवर आ.बच्चू कडू यांनी शनिवारी शासकीय विश्रामगृहात माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. एका गावातून सुरू झालेले आंदोलन राज्यातच नव्हे, तर देशात पसरते, ही भूतो न भविष्यती’ अशी बाब असल्याचे सांगत शेतकऱ्यांच्या आंदोलनाला नेत्याची गरज नसल्याचे या आंदोलनाने दाखवून दिल्याचे ते म्हणाले. काँग्रेसच्या काळातही आंदोलने झालीत. मात्र शेतकऱ्यांवर दरोड्याचे गुन्हे दाखल करणारे भाजप सरकार असू शकते, हे या सत्ताधिशांनी दर्शवून दिल्याचे ते म्हणाले. हे शेतकऱ्यांचे आंदोलन नसून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाड्याने आणलेल्या लोकांचे असल्याचे वक्तव्य करणारे मुख्यमंत्री वायफळ असल्याची टीका त्यांनी केली. इंग्रज सरकारचे लक्ष वेधण्यासाठी भगतसिंगांनी आवाज करणारा बॉम्ब फोडला होता. आताचे सत्ताधीशही बहिरे असल्याने त्यांच्यापर्यंत आवाज पोहोचविण्यासाठी आपण बॉम्ब फेकण्याची भाषा वापरली असल्याचे बच्चू कडू यांनी स्पष्ट केले. शेतकऱ्यांसाठी माझ्यासारखा एखादा आमदार शहीद झाला, तर काहीच बिघडणार नाही. आंदोलनकर्त्यांवर दरोड्याचे गुन्हे दाखल करून त्यांना नामशेष करण्याचा प्रयत्न भाजप सरकारने चालविल्याचा आरोप त्यांनी केला. १२ व १३ जूनचे आंदोलन अतिशय उग्र राहील. त्यात समस्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आग्रही आवाहन आ.बच्चू कडू यांनी केले. शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी हाती घेतलेले हे आंदोलन असून नेत्यांविना सुरू असलेले हे आंदोलन न भूतो न भविष्यती असल्याचे ते म्हणाले.
- तर त्यांनी तारीख सांगावी
बच्चू कडू मारायला आणि मरायला भीत नाही. ज्यांना कुणाला मला मारायचे असेल तर त्यांनी तारीख सांगावी, अमरावतीच्या जयस्तंभ चौकात मी एकटाच येईल. शेतकऱ्यांसाठी मला हाणलेली चपराक माझ्यासाठी गौरवास्पद असेल, असेही त्यांनी सप्ष्ट केले. यू-टर्न घेणाऱ्यांमधला बच्चू नाही, असा पुनरुच्चार त्यांनी केला.
आयएएसना द्याव्यात गाई म्हशी
शेतकऱ्यांना जोडधंदा करण्याचा सल्ला दिला जातो. मात्र दुग्ध व्यवसायही कमालीचा बेभरवशाचा झाला आहे. त्यामुळे सातवा वेतन आयोग लागू करण्यापेक्षा त्यांनाही म्हशी आणि बकऱ्या द्यव्यात आणि त्यांच्या वेतनातील ती तफावतीची रक्कम शेतकऱ्यांना द्यावी, असे मत त्यांनी मांडले.

भाजप कपटी, आतल्या गाठीचे
भाजपवाले कपटी आहेत. ते अणुबॉम्ब टाकून भडकून टाकतील तरीही माहित होणार नाही,असा टोला आ.बच्चू कडू यांनी दिला. सध्या भाजपवालेच केवळ शेतकरी आहेत. त्यांना वगळून साऱ्यांना ते गुंडच समजतात. त्यामुळे आता आम्ही शेतकरी की दहशतवादी हे जाणून घेण्यासाठी आता डीएनए चाचणी करावी काय? असा प्रश्न कडू यांनी उपस्थित केला.

Web Title: Due to Chaupar blockade farmers' aggravated fatigue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.