अटी-शर्तींची सक्ती, नाफेड केंद्रे ओस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2017 11:12 PM2017-11-07T23:12:08+5:302017-11-07T23:15:07+5:30
जिल्ह्यातील दहा केंद्रांवर नाफेडद्वारा सोयाबीनची खरेदी सुरू आहे.
वीरेंद्रकुमार जोगी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्ह्यातील दहा केंद्रांवर नाफेडद्वारा सोयाबीनची खरेदी सुरू आहे. मागील आठ दिवसांत या केंद्रांवर ३६८ शेतकºयांचे ८ हजार २९ क्विंटल सोयाबीन खरेदी करण्यात आले. यातुलनेत व्यापाºयांद्वारा यंदाच्या हंगामात हमीपेक्षा कमी भावाने ४ लाख ४५ हजार क्विंटल सोयाबीनची खरेदी केली. शाककीय खरेदी केंद्रावर आॅनलाइन नोंदणीसह अटी व शर्तींचा भडीमारासोबतच एफएक्यू निकषाचा फटका शेतकºयांना नाहक बसत आहे. यामुळे नाफेड, पणन व सीसीआयची खरेदी केंद्रे ओस पडली आहेत.
यंदाचा हंगाम सुरू झाला असतानाही नाफेडची केंदे सुरू झाली नसल्यामुळे आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकºयांना दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर मिळेल त्या भावात सोयाबीन बाजार समित्यांमध्ये विकावे लागले. व्यापाºयांनीही आधारभूत किमतीपेक्षा कमी भावाने सोयाबीनची खरेदी केली. यामध्ये शेतकºयांना कोट्यवधींचा फटका बसला. नाफेडच्या खरेदी केंद्रावर संबंधित शेतकºयांवर सात-बारा, बँक खात्याची झेरॉक्स, अधारकार्ड यासह सोयाबिनची आर्द्रता आदी अटी लादण्यात आल्या आहेत.
यंदाच्या हंगामात सोयाबीन सवंगणीच्या काळात अवकाळी पाऊस असल्यामुळे शेतकºयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, सोयाबीनची प्रतवारी खराब झाल्यामुळे डागी सोयाबीन खरेदी केंद्रांवर नाकारल्याने शेतकºयांना खुल्या बाजारात विकावा लागला. व्यापाºयांवर नियंत्रण नसल्यामुळे त्यांची मनमानी सुरू आहे. यामध्ये सरळ शेतकºयांना फटका बसत आहे.
व्यापाºयांद्वारे ३,८५० क्विंटल कापसाची खरेदी
यंदाच्या हंगामात पणनला २९, तर सीसीआयद्वारा ५९ क्विंटल कापसाची ४,३२० रूपये प्रतिक्विंटल दराने खरेदी करण्यात आली. यातुलनेत व्यापाºयांद्वारा आजपर्यंत ३,८५० क्विंटल कापसाची ४,१०० ते ४४०० रूपये दराने खरेदी करण्यात आली. शासन केंद्रांवर आॅनलाइन नोंदणीसह अटी व शर्तींचा भडिमार असल्यानेच शेतकºयांनी पाठ फिरविली आहे. येत्या काळात भाववाढीची शक्यता असल्याने पणनची केंद्र ओस पडण्याची भीती वाढली आहे
मूग, उडीद, ज्वारीच्या खरेदीवर परिणाम
शासकीय धान्य खरेदी सुरू झाल्यानंतर बाजार समित्यांमध्ये मुग, उडीद व ज्वारीची आवक होत आहे. शेतकरी शासनाला धान्य न विकता थेट व्यापाºयांशी सौदे करीत असल्याचे चित्र आहे. बाजार समित्यांमध्ये ५१ शेतकºयांनी ५५३ क्विंटल मुग, ६७ शेतकºयांनी ५०७ क्विंटल उडीद विक्री झाला. शेतकºयांनी मोठ्या संख्येत व्यापाºयांकडे मुग व उडीदाची विक्री केली आहे. यंदा कमी पावसामुळे मुग व उडिदाचे उत्पादन प्रभावित झाले आहे. ज्वारी उत्पादक शेतकरी आपला माल थेट व्यापाºयांकडे घेउन जात असल्याचे चित्र आहे.
जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यांमध्ये नाफेडच्या माध्यमातून सोयाबीन, मूग, उडीद व ज्वारीची खरेदी सुरू झाली आहे. मात्र बाजार समितीमध्ये शेतकरी शेतमाल विक्रीस आणत आहेत. मात्र, जिल्ह्याभरात शेतमालाची शासकीय खरेदी अत्यल्प असल्याचे चित्र आहे. केंद्रावर विक्रीसाठी आॅनलाइन नोंदणी व खरेदी करताना लावलेल्या अटी व शर्तीमुळे शेतकºयांत नाफेड यंत्रणेविरुद्ध प्रचंड रोष निर्माण झाला आहे. बाजार समित्यांचे पदाधिकारी हा खेळ निमूटपणे पाहत असून शेतकरी हिताच्या बाता करणारे लोकप्रतिनिधीही गप्प बसल्यामुळे शेतकºयांचा वाली कोण, असा सवाल उपस्थित केला जात आहे. जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये थट्टा सुरू असल्याचा आरोप शेतकºयांनी केला आहे.
जिल्ह्यातील १२ केंद्रांवर सोयाबीनची खरेदी करण्यात येत आहे. शेतकºयांना आॅनलाइन नोंदणीत अडचण नाही. मात्र, यंदाचे बहुतांश सोयाबीन एफएक्यू दर्जाचा असल्यामुळे खरेदी मंदावली आहे.
- रमेश पाटील,
जिल्हा विपणन अधिकारी