क्यूरिंगअभावी महामार्गाची कामे धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2018 10:25 PM2018-06-04T22:25:51+5:302018-06-04T22:26:03+5:30
पावसाळा तोंडावर आला असून तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गाचे काम जोरात सुरू आहे. त्यात पिवळ्या मातीचे खनन करता येणार नाही, तसेच रस्त्यावर टाकलेल्या मातीवर पाऊस पडल्यास अपघातात वाढ होईल. त्यामुळे कंत्राटदारातर्फे काँक्रिट रस्त्यावर (क्यूरिंग)पाणी न टाकताच रस्त्याचे बांधकाम सुरू आहे. तयार झालेला काँक्रिट रास्ता निकृष्ट दर्जाचा बनत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चांदुर बाजार : पावसाळा तोंडावर आला असून तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गाचे काम जोरात सुरू आहे. त्यात पिवळ्या मातीचे खनन करता येणार नाही, तसेच रस्त्यावर टाकलेल्या मातीवर पाऊस पडल्यास अपघातात वाढ होईल. त्यामुळे कंत्राटदारातर्फे काँक्रिट रस्त्यावर (क्यूरिंग)पाणी न टाकताच रस्त्याचे बांधकाम सुरू आहे. तयार झालेला काँक्रिट रास्ता निकृष्ट दर्जाचा बनत आहे.
परतवाडा ते मोर्शी मार्गावर सुरू असलेल्या चांदूर बाजार भागातील राष्ट्रीय महामार्गाच्या कंत्राट एच. जी. इन्फ्रा कंपनीने घेतला आहे. कंत्रातदारातर्फे प्रचंड खनन करून परिसरातील पिवळी माती रास्ता बांधकामत वापरण्यात येत आहे. मात्र, या मातीच्या नागरिकांच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढत असताना कंत्रातदारातर्फे घाईने काँक्रीटचा मलमा चढविण्यात येत आहे. या रस्त्यावर पाणीचे क्यूरिंग केले जात नासल्याने हे काँक्रिट कच्चे राहिले आहे. या निकृष्ट काँक्रिट रस्त्यावरून कोणीही वाहतूक करू नये, याकरिता रस्त्यावर काटेरी झाडे टाकण्यात आले आहे. या महामार्गाचे काँक्रिटचा पहिलाच थर निकृष्ट झाला आहे. याकडे राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाने वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे. चांदूर बाजार ते परतवाडा मार्गावरील बांधकामात फक्त ३ पाण्याचे टँकर सुरू असून, केवळ रस्त्यावरील पिवळी माती उडू नये या करिता वापरले जात आहे. या करिता शेतकऱ्याचा शेतातील पाणी बोअरवेलने घेऊन टँकरच्या मदतीने मातीवर पाणी टाकले जात आहे. त्यामुळे केवळ मातीवर पाणी मारल्याने हा काँक्रिट रस्ता दर्जेदार कसा बनणार, असा प्रश्न रस्त्यावरून वाहतूक करणारे नागरिकांतर्फे केला जात आहे.
काँक्रिट रस्त्याची पोत टिकविण्यासाठी त्या काँक्रिट रस्त्यावर पाणी टाकणे आवश्यक आहे. मात्र, कंत्राटदाराचा मनमानी कारभार व राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाच्या हेतुपुरस्सर दुर्लक्षामुळे शासनाच्या पैशाची उधळपट्टी होत असल्याचा आरोप परिसरातील नागरिकांतर्फे होत आहे. राजकीय वरदहस्त असलेल्या एच.जी. इन्फ्रा या कंत्राटदार कंपनीचे शासकीय अधिकाºयांशी साटेलोटे असल्याने कंत्राटदार व त्यांचे कर्मचारी आपला कारभार चालवीत असल्याचा आरोप परिसरातील नागरिकांतर्फे करण्यात येत आहे.