कापसाच्या उत्पन्नात घट, यंदा भावही नाही
By admin | Published: November 30, 2014 10:57 PM2014-11-30T22:57:01+5:302014-11-30T22:57:01+5:30
दीड महिना उशिरा आलेल्या पावसामुळे सोयाबीनचे पीक निकृष्ट बियाणे, रोगाचा प्रादुर्भाव यामुळे उध्वस्त झाले. किमान तूर, कपाशी तरी तारेल अशी शेतकऱ्यांची अपेक्षा असताना तुरीवर शेंगा पोखरणाऱ्या
शेतकरी अडचणीत : गतवर्षीपेक्षाही कमी भावाने खरेदी
अमरावती : दीड महिना उशिरा आलेल्या पावसामुळे सोयाबीनचे पीक निकृष्ट बियाणे, रोगाचा प्रादुर्भाव यामुळे उध्वस्त झाले. किमान तूर, कपाशी तरी तारेल अशी शेतकऱ्यांची अपेक्षा असताना तुरीवर शेंगा पोखरणाऱ्या अळींचा प्रादुर्भाव झाला तर जमिनीत आर्द्रता नसल्याने कपाशीची बोंड फुटायला तयार नाही. कपाशीच्या उत्पन्नात सरासरी ५० टक्याची घट आली असताना कापसाला मागील वर्षीपेक्षा कमी भाव मिळत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
जिल्ह्यात यंदाच्या प्रतिकूल परिस्थितीत शेतकऱ्यांनी ३ लाख हेक्टर तूर व २ लाख हेक्टर क्षेत्रात कपाशीची पेरणी केली. मात्र पावसाअभावी व बोगस बियाण्यांमुळे सोयाबीन उद्ध्वस्त झाले. शेतकऱ्यांना प्रचंड नुकसान सहन करावे लागले. उत्पादन खर्च अर्धाही निघाला नाही. अशा स्थितीत शेतकरी कपाशीकडे आस लावून असताना कापसाचे उत्पन्न कमी होत आहे व भावदेखील पडले आहे. यावर्षी ४०५० रुपये प्रतिक्विंटल पासून सुरुवात झालेला कापूस आला ३८०० रुपयांनी मागत आहे. हमी भावाची केवळ दोनच केंद्र सुरु आहेत. सोयाबीनप्रमाणेच कपाशीचा उत्पादन खर्च निघण्याची शक्यता नसल्याने शेतकऱ्यांची निराशा झाली आहे. जिल्ह्यात सर्वच तालुक्यात कपाशीवर ‘लाल्या’चा प्रादुर्भाव झाला आहे.
एक फवारीसाठी हजाराच्या वर खर्च येत आहे. डीएपी १२०० रुपये बॅग आहे. मागील दोन वर्षात खतांच्या किमती दुपटीने वाढल्या. निसर्गही साथ देत नाही. काही भागात ‘कोकडा’ तर काही भागात ‘मर’ रोगाचा प्रार्दूभाव आहे.
यामुळे सरासरी उत्पन्नात मोठ्या प्रमाणात कमी आली. व्यापारीदेखील कमी किंमतीत कापूस मागत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. (प्रतिनिधी)