एक लाख हेक्टर बाधित उत्पादनात ५१ टक्क्यांनी घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2017 10:05 PM2017-12-09T22:05:54+5:302017-12-09T22:07:07+5:30
यंदाच्या हंगामात बोंड अळीमुळे १ लाख ३ हजार ८०० हेक्टरवरील कपाशीे बाधित झाली व उत्पादनात ५१ टक्क्यांची घट अपेक्षित असल्याचा प्राथमिक अहवाल शनिवारी कृषी विभागाने जिल्हाधिकाºयांना दिला. हा अहवाल शासनाला सादर करण्यात आला. सध्या बाधित क्षेत्राचे संयुक्त पंचनामे सुरू आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : यंदाच्या हंगामात बोंड अळीमुळे १ लाख ३ हजार ८०० हेक्टरवरील कपाशीे बाधित झाली व उत्पादनात ५१ टक्क्यांची घट अपेक्षित असल्याचा प्राथमिक अहवाल शनिवारी कृषी विभागाने जिल्हाधिकाऱ्यांना दिला. हा अहवाल शासनाला सादर करण्यात आला. सध्या बाधित क्षेत्राचे संयुक्त पंचनामे सुरू आहेत.
बियाणे कंपन्यांकडून भरपाई व ‘एनडीआरएफ’ची मदत मिळावी, यासाठी गुलाबी बोंड अळीने बाधित क्षेत्राचे सर्वेक्षण व पंचनाम्याचे आदेश गुरुवारी जिल्ह्यधिकाऱ्यांनी सर्व तालुका यंत्रणांना दिलेत व दोन दिवसांत अहवाल मागविला. प्राथमिक अहवालापेक्षा जास्त प्रत्यक्ष नुकसान असल्याचा शेतकºयांचा आरोप आहे. ५ डिसेंबरच्या मंत्रिमंडळाच्या निर्णयावर कपाशीवरील गुलाबी बोंड अळी व तुडतुड्यांमुळे बाधित झालेल्या क्षेत्राचे पंचनामे करण्याचे आदेश महसूल उपसचिव सु.ह. उमरीकर यांनी सर्व विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांना दिलेत. जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी या पत्राच्या अनुषंगाने सर्व तहसीलदार, बीडीओ व तालुका कृषी अधिकारी यांना कपाशीचे पंचनामे करण्याचे आदेश गुरुवारी दिले होते.
बाधित तालुक्यातील सरासरी नुकसान
बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यात हेक्टरी ८४९ किलो रुईचे नुकसान झाल्याने सरासरी उत्पादनात ५१ टक्क्यांनी घट होणार आहे. यामध्ये सर्वाधिक दर्यापूर तालुक्यात ८० टक्के, नांदगाव खंडेश्वर ७८, अमरावती, चांदूर बाजार, भातकुली, अंजनगाव सुर्जी, धारणी व चिखलदरा तालुक्यात ५०, चांदूर रेल्वे २५, धामणगाव रेल्वे ६०, मोर्शी ५५, वरूड १०, तिवसा ४० व अचलपूर तालुक्यात ६० टक्के नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
रुईचे उत्पादन हेक्टरी ८४९ किलोने कमी
बोंड अळीमुळे हेक्टरी ८४९ किलो रुईचे उत्पादन कमी होणार आहे. यामध्ये भातकुली तालुक्यात सर्वाधिक १,०५६ किलो, अमरावती ८४३, चांदूर रेल्वे ८३५, धामणगाव रेल्वे ७२२, नांदगाव खंडेश्वर ८४४, मोर्शी ८८१, वरूड ८१०, चांदूर बाजार ९४१, तिवसा ९३७, अचलपूर ९५०, अंजनगाव सुर्जी ९२१, दर्यापूर ९१४, धारणी ४७२ व चिखलदरा तालुक्यात ५२५ किलो रुईच्या उत्पादनात घट येणार असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.