अमरावती जिल्ह्याला दुष्काळाच्या झळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2017 04:49 PM2017-09-02T16:49:26+5:302017-09-02T16:49:44+5:30

पावसाने दीर्घ दडी मारल्याने परिसरातील अडीचशेवर गावे आणि दर्यापूर-अंजनगाव शहरांना पाणीपुरवठा करणा-या शहानूर प्रकल्पाच्या पाणीपुरवठ्याचे नियोजन होणे गरजेचे आहे.

Due to drought in Amravati district | अमरावती जिल्ह्याला दुष्काळाच्या झळा

अमरावती जिल्ह्याला दुष्काळाच्या झळा

Next

अंजनगाव सुर्जी, दि. 2 - ऑगस्ट महिन्यात पावसाच्या प्रमाणानुसार पाण्याची भरीव आवक धरणात येणे आवश्यक होते, पण पावसाने दीर्घ दडी मारल्याने परिसरातील अडीचशेवर गावे आणि दर्यापूर-अंजनगाव शहरांना पाणीपुरवठा करणा-या शहानूर प्रकल्पाच्या पाणीपुरवठ्याचे नियोजन होणे गरजेचे आहे. तशा स्पष्ट सूचना जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता सुरेंद्र कोपलवार यांनी कनिष्ठ अभियंत्यांना दिल्या आहेत. पिण्याच्या पाण्याचा काळजीपूर्वक वापर करण्याच्या सूचना ग्राहकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवा, अशाही सूचना देण्यात आल्या आहेत. 

त्यानुसार या विभागाने धरणातील जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या पुरवठ्यावर आचारसंहिता लावण्याचे निश्चित केले आहे. सप्टेंबर महिन्यात जर पुरेशी आवक झाली नाही तर या धरणातून होणारा पाणीपुरवठा एक दिवसाआड करण्याचे विभागाने निश्चित केले आहे. दिनांक २८ ऑगस्ट रोजी पाणीपुरवठा व जलसिंचन विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांनी धरणाची पाहणी करून हा निर्णय घेतला आहे. 

यावर्षी ऑगस्ट महिन्यात या धरणातील पाण्याची पातळी फक्त एक मीटरने वाढली आहे. ऑगस्ट महिन्यात पावसाने सलग २५ दिवसांची दडी मारल्याने धरणाच्या क्षेत्रात वाढलेली पातळी तीन वर्षांच्या तुलनेत नगण्य आहे. ऑगस्ट २०१४ मध्ये ४३ दशलक्ष घनमीटरचा पाणीसाठा आॅगस्ट २०१५ मध्ये ३८ दशलक्ष घनमीटर झाला होता. ऑगस्ट २०१६ मध्ये त्यात समाधानकारक वाढ झाली. परंतु यावर्षी पावसाने दीर्घ उघडीप दिल्याने यावर्षीच्या ऑगस्ट महिन्यात धरणात फक्त ३३ दशलक्ष घनमीटर पाणी आहे. त्यादृष्टीने पाण्याचे नियोजन करणे आवश्यक झाले आहे. 

यावर्षी शहानूर नदीला एकही पूर गेला नाही. ज्या चिखलदरा तालुक्यातून नदीचा उगम आहे तेथे सर्वात कमी पाऊस पडला. त्यामुळे धरणाचे दरवाजे उघडण्याची एकदाही वेळ आली नाही. अन्यथा दरवर्षी जास्तीचे पाणी धरणातून सोडून पाण्याच्या पातळीचे नियोजन केले जाते. 

पाणीपुरवठा विभाग नियोजनाच्या तयारीत
जलशुद्धीकरण केंद्रातून केला जाणारा पाणीपुरवठा व त्याची देखभाल दुरूस्ती यासाठीसुद्धा वेळ आवश्यक आहे. त्यात यावर्षी पाणी साठ्यातील झालेली चिंताजनक घट यामुळे अधिकाºयांनी नियोजन करण्याच्या लेखी सूचना दिल्या आहेत. अधिकारी वर्ग आवश्यक त्या उपाययोजना करीत असून प्रसार माध्यमांनासुद्धा याबाबत प्रसिद्धी देण्यासाठी सूचना दिल्या आहेत.

धरणात पुरेसा पाणीसाठा

पावसाचे प्रमाण कमी असले तरी परतीचा पाऊस जाण्यासाठी सप्टेंबर महिन्याची वाट पाहणे महत्त्वाचे आहे. ऑगस्ट महिन्यातील पावसाच्या दमदार हजेरीने नदी जिवंत झाली असून पाण्याची आवक समाधानकारक होईल, असे वाटते. निर्णय वरिष्ठ अधिकाºयांनी घ्यावयाचे असल्यामुळे त्यांची अंमलबजावणी आमच्यावर बंधनकारक आहे. 
- सुमित हिरेकर, शाखा अभियंता, शहानूर प्रकल्प, अंजनगाव

Web Title: Due to drought in Amravati district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.