३० हजार हेक्टरवर दुबार पेरणीचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2017 12:03 AM2017-06-24T00:03:32+5:302017-06-24T00:03:32+5:30

रोहिणी व मृग नक्षत्रात मान्सूनपूर्व पाऊस झाला. हवामान खात्यानेही मान्सून वेळेवर व समाधानकारक असल्याचा ....

Due to drought sowing on 30 thousand hectares | ३० हजार हेक्टरवर दुबार पेरणीचे सावट

३० हजार हेक्टरवर दुबार पेरणीचे सावट

Next

पाऊस बेपत्ता : शेतकऱ्यांसमोर नवे संकट
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : रोहिणी व मृग नक्षत्रात मान्सूनपूर्व पाऊस झाला. हवामान खात्यानेही मान्सून वेळेवर व समाधानकारक असल्याचा दुजोरा दिल्याने जिल्ह्यातील ३८ हजार ७४४ शेतकऱ्यांनी खरिपाची पेरणी केली. मात्र, मृग नक्षत्र कोरडे गेल्याने शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहेत. संरक्षित सिंचनाची सुविधा असणारे क्षेत्र वगळता किमान ३० हजार हेक्टर क्षेत्रातील पेरण्यांवर मोड येण्याची शक्यता आहे.
यंदाच्या खरिपासाठी जिल्ह्यात सात लाख २८ हजार हेक्टर क्षेत्राचे नियोजन आहे. मृग नक्षत्रापूर्वी शेतकऱ्यांनी खरिपपूर्व मशागत केली. पावसाच्या अपेक्षेने पेरणी केली. राज्यात मान्सूनचे आगमन देखील झाले. विदर्भाच्या उंबरठ्यावर तो पोहोचला. अगदी बुलडाण्यापर्यंत आल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पेरणी केली. नंतर मात्र त्याचा प्रवास थबकला.

२३ दिवसांत फक्त ६९ मिमी पाऊस
अमरावती : जमिनीत पुरेसा ओलावा नसल्याने बिजांकुरण झालेच नाही. त्यामुळे बियाणे कुजू लागले. जेथे बिजांकुरण झाल, त्याठिकाणी उगवलेली इवलीशी रोपे करपू लागली. त्यामुळे आधीच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांसमोर नवे संकट उभे ठाकले आहे. यंदाच्या हंगामासाठी जिल्ह्यात सात लाख २८ हजार १०२ हेक्टरक्षेत्राचे नियोजन आहे. यापैकी ३८ हजार ७४४ हेक्टरक्षेत्रात गुरूवारपर्यंत पेरणी झाली. यामध्ये सर्वाधिक १८ हजार ७१३ हेक्टर क्षेत्र कपाशीचे आहे. धान दोन हजार ८७९ हेक्टर, ज्वारी दोन हजार ९६ हेक्टर, मका दोन हजार ४६५ हेक्टर, असे एकूण सात हजार ४५० हेक्टर तृणधान्य, तसेच तूर पाच हजार एक हेक्टर, १५ हेक्टर मूग, उडिद दोन हेक्टर, असे एकूण पाच हजार १८ हेक्टर कडधान्य व सात हजार ४९४ हेक्टर सोयाबीन, भुईमूग २२ हेक्टर, असे एकूण सात हजार ५१६ हेक्टर गळित धान्य व कापूस १८ हजार ७१३ हेक्टर तसेच ऊस व अन्य पिकांची पेरणी झाली आहे. यापैकी किमान ३० हजार हेक्टरक्षेत्रात पावसाअभावी दुबार पेरणीची शक्यता आहे.
जिल्ह्यात १ ते २३ जून दरम्यान १११.९ मिमी सरासरी पाऊस पावसाची सरासरी अपेक्षित असताना प्रत्यक्ष ६९.२ मिमी पाऊस पडला आहे. ही ६१.८ टक्केवारी आहे. आतापर्यंत अमरावती तालुक्यात ७१.२, भातकुली ७१.२, नांदगाव ८६.६,चांदूररेल्वे ६९.५, धामणगाव रेल्वे ७८.८, तिवसा ६९, मोर्शी ७२.६, वरुड ४५.६,अचलपूर ५९.७, चांदूरबाजार ५४.९, दर्यापूर ७६.६, अंजनगाव सुर्जी ५९.८, धारणी ७१.२, व चिखलदरा तालुक्यात १०२ मिमी पाऊस पडला आहे.

अशी आहे तालुकानिहाय पेरणी
जिल्ह्यात सद्यस्थितीत ३८,७४४ हेक्टरक्षेत्रात पेरणी झाली आहे. यामध्ये सर्वाधिक ४१ टक्के म्हणजे १८,९२९ हेक्टरमध्ये धारणी तालुक्यात पेरणी झाली आहे. अमरावती ४१४ हेक्टर, भातकुली २४५ हेक्टर, नांदगाव खंडेश्वर ३०८ हेक्टर, चांदूररेल्वे १३० हेक्टर, तिवसा २८४ हेक्टर, मोर्शी २,९२९ हेक्टर, वरूड ३,०९३ हेक्टर, दर्यापूर १२ हेक्टर,अंजनगाव सुर्जी ४९० हेक्टर, अचलपूर ७७६ हेक्टर,चांदूरबाजार १,१३१ हेक्टर व धामणगाव रेल्वे तालुक्यात १० हजार तीन हेक्टरमध्ये पेरणी झाली आहे. यामधील किमान ३० हजार हेक्टरक्षेत्रात दुबार पेरणीचे सावट आहे.

Web Title: Due to drought sowing on 30 thousand hectares

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.