‘आॅनलाईन’च्या सक्तीमुळे ‘पणन’ची केंद्रे ओस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2017 11:20 PM2017-11-01T23:20:58+5:302017-11-01T23:21:32+5:30
जिल्ह्यात पणन महासंघाची सहा व सीसीआयची दोन केंद्रे सुरू झाली. मात्र, उद्घाटनाला कापसाचे बोंडही मिळाले नाही.
गजानन मोहोड।
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्ह्यात पणन महासंघाची सहा व सीसीआयची दोन केंद्रे सुरू झाली. मात्र, उद्घाटनाला कापसाचे बोंडही मिळाले नाही. खुल्या बाजारात शासन केंद्राइतकाच भाव मिळत असताना केंद्रांवर आॅनलाइन नोंदणीसह अटी व शर्थींचा भडीमार असल्यानेच शेतकºयांनी केंद्रांकडे पाठ फिरविली आहे. केवळ अंजनगाव सुर्जी केंद्रावर मुहूर्ताला ३० क्विंटल कापूस मिळाला. आतापर्यंत आठ केंद्रांवर केवळ १६ शेतकºयांनी आॅनलाइन नोंदणी केली असल्याचे वास्तव आहे.
यंदा अमरावती, अचलपूर, दर्यापूर व अंजनगाव सुर्जी, दर्यापूर, तिवसा व वरूड या केंद्रांवर २५ आॅक्टोबरपासून कापसाची खरेदी सुरू झाली. मात्र अंजनगाव सुर्जी वगळता या केंद्रांवर आतापर्यतची खरेदी निरंक आहे. हीच स्थिती सीसीआयची आहे. चांदूर रेल्वे व धामणगाव रेल्वे केंद्रांवर खरेदी सुरू करण्यात आली असताना शेतकºयांची मात्र पाठ आहे. यंदा पणनला स्वतंत्रपणे कापूस खरेदीची परवानगी नाकारली. सीसीआयची अभिकर्ता म्हणूून खरेदीची परवानगी दिली. सध्या ६ केंद्रांवर पणन महासंघाद्वारा कापूस खरेदीचा शुभारंभ केला. तूर्तास शेतकºयांवर कापूस नाही, ज्यांच्याकडे कापूस आहे तो शेतकरी केंद्रावरील अटी व शर्तीमूळे खुल्या बाजारात वळला आहे.
बोनस देण्याची घोषणा, पूर्तता नाहीच
राज्य शासनाने तीन वर्षांपूर्वी कापसाला किमान ५०० रूपये बोनस देण्याची घोषणा केली होती. अद्यापही या घोषणेची पूर्तता नाहीच. गुजरात सरकारने कापूस उत्पादकांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी प्रतिक्विंटल ५०० रुपये बोनस जाहीर केला आहे. राज्यात अशीच स्थिती राहिल्यास कापूस व कापड उद्योगांवर संक्रांत येणार आहे.
नोंदणीसाठी अटी-शर्तींचा भडीमार
पणनच्या कापूस खरेदी केंद्रांवर कापूस विक्री करण्यापूर्वी शेतकºयांना बाजार समितीमध्ये आॅनलाइन नोंदणी करावी लागणार आहे. यासाठी शेतकºयांना सातबारा, बँकेचे खाते क्रमांकासह अधारक्रमांकही द्यावा लागणार आहे. यामध्ये कापसात आठ ते १२ टक्क्यांपेक्षा आर्द्रता नको, हेदेखील निकष आहे. यावेळेस मुख्यमंत्र्यांनी कापसाचे पेमेंट एका आठवड्यात देण्याचे आश्वासन दिले असले तरी केंद्रांवर अटी व शर्तींचा भडीमार असल्यानेच शेतकºयांचा कल व्यापाºयांकडे आहे.
असा आहे हमीभाव अन् खासगीत भाव
यंदाच्या हंगामात कापसाच्या वाणानुसार हमीभाव जाहीर करण्यात आला आहे. पहिल्या स्टेपलमध्ये ४,३२० व दुसºया स्टेपलमध्ये ४,२२० रुपये प्रतिक्विंटल असा दर जाहीर करण्यात आलेले आहेत. खासगी बाजारात एक नोव्हेंबरला विक्री झालेल्या कापसानुसार अमरावतीला सरासरी ४००० रूपये, धामणगाव रेल्वे ४२००, अचलपूर ४३५० तर धारणी येथे ४०५० रूपये प्रतिक्विंटल दर मिळाला आहे