असंतुलनामुळे जमिनीवरील वनक्षेत्र घटले
By admin | Published: June 4, 2014 11:22 PM2014-06-04T23:22:45+5:302014-06-04T23:22:45+5:30
नैसर्गिक संतुलनासाठी जमिनीवर ३३ टक्के वनक्षेत्र असणे आवश्यक असताना नुकत्याच घेण्यात आलेल्या एका सर्वेक्षणाअंती वनक्षेत्र हे केवळ २१ टक्के असल्याला धक्कादायक अहवाल हाती आला आहे.
अमरावती: नैसर्गिक संतुलनासाठी जमिनीवर ३३ टक्के वनक्षेत्र असणे आवश्यक असताना नुकत्याच घेण्यात आलेल्या एका सर्वेक्षणाअंती वनक्षेत्र हे केवळ २१ टक्के असल्याला धक्कादायक अहवाल हाती आला आहे. राज्य शासनाने काही वर्षांपूर्वी १00 क ोटी वृक्ष लागवडीचे लक्ष ठेवले होते. मात्र हे लक्ष केवळ कागदावरच राहिले, असे वनक्षेत्राच्या बकाल व्यवस्थेवरून दिसून येते.
पर्यावरणाचा समतोल ठेवायचा असेल तर जमिनीवर किमान ३३ टक्के वनक्षेत्र आवश्यक आहे. परंतु वनक्षेत्राचे प्रमाण घटत असल्याचा अहवाल पुढे आल्याने वृक्ष संगोपन, वृक्ष लागवड आणि पर्यावरणाशी निगडीत राबवित असलेल्या उपाययोजनांची वाट लागल्याचे चित्र आहे. जमिनीवर वनक्षेत्र घटत चालल्याची बाब अतिशय चिंतणीय असली तरी वायू, जल, ध्वनी प्रदूषणाने यात भर घालून पर्यावरणाचा असमतोल करण्यास कोणतीही कसर सोडली नाही, हे वास्तव आहे.बेसुमार वृक्षतोडीचा पर्यावरण असमतोलावर परीणाम होत असताना ही वृक्षतोड थांबविण्यासाठी वनविभागाकडून कठोर उपाययोजना केल्या जात नाही, असाच कारभार सुरू आहे.
वनक्षेत्र ३३ टक्के व्हावे, यासाठी शासनस्तरावरून प्रयत्न सुरू असले तरी समाजाने सुध्दा वृक्षलागवड आणि संगोपनासाठी सामूहिक प्रयत्नाची गरज असल्याचे पर्यावरण प्रेमींचे म्हणणे आहे.
सामाजिक वनीकरणाचा वाटा
वृक्ष लागवड आणि संगोपनासाठी येथील सामाजिक वनीकरण विविध उपक्रम राबविते. मात्र या विभागाने रस्ता दुर्तफा वृक्ष लागवड करून पर्यावरण समतोलासाठी खारीचा वाटा उचलला आहे. जिल्हय़ात १२ तालुकय़ांमध्ये २७ रस्तांवर ११९.३0 कि.मी. लांब रस्ता दुर्तफा वृक्ष लागवड करण्यात आली आहे.
या रोपट्यांचे संगोपन व संवर्धन व्यवस्थितरित्या करण्यात आल्याने उन्हाळय़ातही जनावरे, शेतकरी व वाटसरूंना वृक्षाची सावली घेता आली, असे सामाजिक वनीकरणाचे वाहाणे यांनी सांगितले.वलगाव ते दर्यापूर रस्ता हे जिवंत उदाहरण आहे.यंदा ४७४ कि.मी.च्या रस्त्यावर ४ लाख, ७४ हजार रोपांची लागवड केली जाणार आहे.