अपुरा पाऊस, उद्ध्वस्त खरीप, दुष्काळाचे सावट; पश्चिम विदर्भात विदारक स्थिती 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2018 05:40 PM2018-10-04T17:40:33+5:302018-10-04T17:41:20+5:30

पश्चिम विदर्भात सरासरीच्या ११५ मिमी पाऊस कमी झाल्याने खरिपाचे पीक करपले आहे. भूजलात मोठी तूट असल्याने रबीचा हंगामही धोक्यात आहे.

Due to insufficient rainfall, destroyed crop, drought; Dismissal state in western Vidarbha | अपुरा पाऊस, उद्ध्वस्त खरीप, दुष्काळाचे सावट; पश्चिम विदर्भात विदारक स्थिती 

अपुरा पाऊस, उद्ध्वस्त खरीप, दुष्काळाचे सावट; पश्चिम विदर्भात विदारक स्थिती 

Next

- गजानन मोहोड

अमरावती : पश्चिम विदर्भात सरासरीच्या ११५ मिमी पाऊस कमी झाल्याने खरिपाचे पीक करपले आहे. भूजलात मोठी तूट असल्याने रबीचा हंगामही धोक्यात आहे. ४९९ प्रकल्पांमध्ये पूर्ण संचय पातळीच्या निम्म्यावर असणारा जलसाठा आगामी काळासाठी धोक्याची घंटा आहे. सलग चार वर्षांपासून नापिकीच्या झळा सोसणाºया वºहाडात दरदिवशी तीन शेतकºयांच्या आत्महत्या होत असल्याचे धक्कादायक वास्तव आहे.
पश्चिम विदर्भात पावसाच्या चार महिन्यात ७७८ मिमी सरासरी अपेक्षित असताना ६६३ मिमी पावसाची नोंद झाली. अकोला व वाशिम जिल्ह्यात सरासरीइतका, तर अमरावती, यवतमाळ व बुलडाणा जिल्ह्यात सरासरीच्या ३० टक्के कमी पाऊस झाला. विशेष म्हणजे, १० आॅगस्टपासून ४५ दिवस पावसाचा खंड राहिल्याने किमान १० लाख हेक्टरमधील सोयाबीन, ६० हजार हेक्टरवरील मूग व ५० हजार हेक्टरवरील उडिदाचे पीक जागीच करपले. सहा लाख हेक्टरमध्ये गुलाबी बोंडअळीचा प्रकोप यंदाही असल्याने कपाशीचे सरासरी उत्पादन किमान ४० टक्क्यांनी घटणार आहे. भूजल पातळीदेखील खोल गेल्याने सध्या बुलडाणा जिल्ह्यात आठ टँकरने पाणीपुरवठा होत आहे. 

सर्वाधिक शेतकरी आत्महत्या बुलडाणा जिल्ह्यात
 यंदाच्या २५० दिवसांत ७५० शेतकºयांनी मृत्यूला कवटाळले. सर्वाधिक २२१ शेतकरी आत्महत्या बुलडाणा जिल्ह्यात झाल्यात. बहुधा यंदा राज्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या बुलडाणा जिल्ह्यात झाल्यात. अमरावती १६५, अकोला ९६, यवतमाळ १४८, वाशिम ५७ व वर्धा जिल्ह्यात ६३ शेतकºयांनी आत्महत्या केली.

अडीच लाख शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत
कर्जमाफी  योजनेसाठी विभागातील ९ लाख ७२ हजार १३७ शेतकºयांनी आॅनलाइन अर्ज केलेत. १५ महिन्यांच्या अवधीत ७ लाख ११ हजार ६९८ शेतकºयांना ३६१४ कोटींची कर्जमाफी देण्यात आली. अद्याप २ लाख ६० हजार ४३९ शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहेत.

५३६० कोटींचे वाटप रखडले
यंदाच्या खरिपासाठी विभागातील बँकांना ८२६३ कोटींचे कर्जवाटपाचे लक्ष्यांक देण्यात आले. ३० सप्टेंबरला खरीप हंगामाचे कर्जवाटप संपले. बँकांनी  ३ लाख ९० हजार १९६ शेतकºयांना २९०३ कोटींचे वाटप केले, तर तब्बल ५३६० कोटींचे वाटप झालेले आहे.

 बुलडाणा जिल्ह्यात प्रकल्पाची स्थिती गंभीर
विभागातील ४९९ प्रकल्पांमध्ये पूर्ण जलसंचय पातळीच्या तुलनेत ६३ टक्के साठा शिल्लक आहे. यामध्ये नऊ मुख्य प्रकल्पांमध्ये ६० टक्के, २४ मध्यम प्रकल्पांमध्ये ७१ टक्के, तर ४६६ लघू प्रकल्पांमध्ये ६३ टक्केच साठा आहे. बुलडाणा जिल्ह्यात ज्ञानगंगा, पलढग, मस, कोराडी, मन, तोरणा, उतावळी, नळगंगा, पेनटाकळी व खडकपूर्णा प्रकल्पात २५ टक्क्यांपेक्षा कमी जलसाठा आगामी काळासाठी धोक्याची घंटा आहे.

Web Title: Due to insufficient rainfall, destroyed crop, drought; Dismissal state in western Vidarbha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.