हवाई सर्वेक्षण सुरू झाल्याने आदिवासींमध्ये दाटली भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2018 01:38 AM2018-08-17T01:38:08+5:302018-08-17T01:39:57+5:30

तालुक्यातील अनेक गावांत बुधवारी दुपारी ३ वाजेपासून सायंकाळपर्यंत हेलिकॉप्टरने अगदी कमी उंचीवरून घिरट्या घातल्या. त्यामुळे आदिवासींमध्ये भीती दाटली होती. तापी धरणाच्या हवाई सर्वेक्षणाचे वृत्त हाती येताच चर्चांना विराम लागला.

Due to the launch of air survey, | हवाई सर्वेक्षण सुरू झाल्याने आदिवासींमध्ये दाटली भीती

हवाई सर्वेक्षण सुरू झाल्याने आदिवासींमध्ये दाटली भीती

Next
ठळक मुद्देहेलिकॉप्टरच्या धारणी परिसरात पाच तास घिरट्या : तापी धरणाच्या कामाला मध्य प्रदेशातून गती

श्यामकांत पाण्डेय ।
लोकमत न्यूज नेटवर्क
धारणी : तालुक्यातील अनेक गावांत बुधवारी दुपारी ३ वाजेपासून सायंकाळपर्यंत हेलिकॉप्टरने अगदी कमी उंचीवरून घिरट्या घातल्या. त्यामुळे आदिवासींमध्ये भीती दाटली होती. तापी धरणाच्या हवाई सर्वेक्षणाचे वृत्त हाती येताच चर्चांना विराम लागला. मात्र, या कामाला मध्य प्रदेशातून गती मिळाल्याच्या वार्तेने या आदिवासी क्षेत्रातील वातावरण ढवळून निघाले आहे.
मेळघाटातील धारणीपासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावरील खाऱ्या गावाजवळ पूर्व-पश्चिम वाहणाºया तापी नदीवरधरणाचे काम सुरू असले तरी या कामाला विरोध होत असल्यामुळे प्रत्यक्षात धारणी तालुक्यात कोणत्याही प्रकारचे धोरणात्मक निर्णय न घेता, संपूर्ण प्रक्रिया मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर आणि खान्देशातून सुरू आहे. विशेष म्हणजे, धारणी तालुक्यातील खाऱ्या, घुटीघाट परिसरात तापी नदीवर बहुप्रतीक्षित तापी धरणाचे कामाचे हवाई सर्वेक्षण सुरू होण्याची बातमी १३ आॅगस्टला ‘लोकमत’च्या जळगाव आवृत्तीतून १३ आॅगस्टला प्रसिद्ध झाली. याबाबत होणाऱ्या कार्याची प्रगती बऱ्हाणपूर किंवा जळगाव येथून प्रकाशित होणाºया विविध वृत्तपत्रांमधून मेळघाटवासीयांना वाचावयास मिळत आहे. धारणी तालुक्यात मात्र धरणाबाबत कमालीची गुप्तता ठेवण्यात येत आहे.
असंतोष वाढला
प्रकल्पस्थळ धारणी तालुक्यातील खाऱ्या या गावाजवळ, तर धरणाबाबत होणाऱ्या प्रत्येक निर्णयाचे सूत्र मध्य प्रदेशातील मंत्री अर्चना चिटणीस आणि महाराष्ट्रात गिरीश महाजन यांच्याकडे आहे. मेळघाटाला प्रकल्पाबाबत होणाऱ्या सर्व माहितीपासून अलिप्त ठेवले आहे. मेळघाटातील एकही गाव पाण्याखाली येणार नाही ही घोषणा फोल तर ठरणार नाही ना, अशी भीती आदिवासींमध्ये असंतोष वाढला आहे.
जळगावातून धरणाच्या हालचाली
खान्देशातील गिरीश महाजन यांनी या योजनेला गती दिली. त्यांच्या प्रयत्नाने मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्र्यांनी बºहाणपूर येथे जाऊन भाजपच्या आमदार यांच्याशी संपर्क साधून तापी धरणाच्या कामाच्या अंमलबजावणीचे जोरदार प्रयत्न चालविले आहेत. त्याअनुषंगाने १५ आॅगस्ट रोजी हवाई सर्वेक्षण सर्वेक्षणासाठी हेलिकॉप्टरने घिरट्या घातल्या.
नेपानगरचे आमदार सक्रिय
नेपानगर येथील आमदार आणि मंत्री अर्चना चिटणीस यांच्या प्रयत्नाने या प्रकल्पाला युद्धस्तरावर गती दिली जात आहे. धारणीच्या अवकाशात १५ आॅगस्ट रोजी पाच तासापर्यंत हेलिकॉप्टर घिरट्या घालत होते. ते १४ किलोमीटर अंतरावरील मध्यप्रदेशातील देडतलाई गावात शाळेच्या प्रांगणात उतरविण्यात आले. विरोधच होऊ नये, यासाठी गुप्तता पाळली जात आहे.
आघाडी शासनाचा होता तीव्र विरोध
तत्कालीन पालकमंत्री सुनील देशमुख यांनी हवाई सर्वेक्षणाची घोषणा केली होती. त्यांनी तापी प्रकल्पाबाबत धारणीत प्रकल्प अधिकारी कार्यालयात जाहीर सभा घेतली होती. या सभेमध्ये उपस्थितांनी तापी धरणाच्या निर्मितीमुळे आदिवासी संस्कृती नष्ट होण्याची भीती व्यक्त करून प्रकल्प रद्द करण्याची मागणी केली होती. भाजपचे तत्कालीन आमदार राजकुमार पटेल यांनी सर्वेक्षण अधिकाºयांना पळवून लावत निशाणाकरिता झेंडे उखडून टाकले होते.

Web Title: Due to the launch of air survey,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.