ज्वालाग्राही रासायनिक द्रव्यामुळे लाल शाळेला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 01:03 AM2018-03-23T01:03:54+5:302018-03-23T01:03:54+5:30

ऐतिहासिक आणि वैभव संपन्नतेचा वारसा असलेल्या येथील नेहरू मैदानातील लाल शाळेला लागलेली आग ज्वालाग्राही रासायनिक द्रव्यामुळे लागली असल्याचा प्राथमिक निष्कर्ष त्रिसदस्यीय समितीने काढला आहे.

Due to the presence of flammable chemical, a fire in the red school | ज्वालाग्राही रासायनिक द्रव्यामुळे लाल शाळेला आग

ज्वालाग्राही रासायनिक द्रव्यामुळे लाल शाळेला आग

Next
ठळक मुद्देघातपात फेटाळला : त्रिसदस्यीय समितीचा प्राथमिक निष्कर्ष

ऑनलाईन लोकमत
अमरावती : ऐतिहासिक आणि वैभव संपन्नतेचा वारसा असलेल्या येथील नेहरू मैदानातील लाल शाळेला लागलेली आग ज्वालाग्राही रासायनिक द्रव्यामुळे लागली असल्याचा प्राथमिक निष्कर्ष त्रिसदस्यीय समितीने काढला आहे. महापालिका उच्च प्राथमिक शाळेच्या ज्या प्रयोगशाळेच्या खोलीला आग लागली. तेथील विद्युत पुरवठा खंडित होता. त्यामुळे शॉर्ट सर्किटच्या शक्येतेसह घातपाताची शक्यता समितीने नाकारली आहे.
उपायुक्त नरेंद्र वानखडे, शिक्षणाधिकारी डी. यू. गावंडे आणि अग्निशमन अधीक्षक भारतसिंग चौव्हाण या त्रिसदस्यीय समितीने त्यांचा चौकशी अहवाल १३ मार्च रोजी आयुक्तांना सुपूर्द केला. तो अहवाल २० मार्चच्या आमसभेत ठेवण्यात आला. मात्र, दुपारी सभा स्थगित करण्यात आल्याने अहवालावर चर्चा होऊ शकली नाही.
नेहरू मैदानस्थित महापालिका माध्यमिक मुलांच्या शाळेला १४ फेब्रुवारीला सायंकाळी ७ ते ७.१५ च्या सुमारास आग लागली. यात प्रयोगशाळेच्या खोलीसह छत व अन्य साहित्य भस्मसात झाले. रात्री १२ च्या सुमारास आग आटोक्यात आली. त्यात सुमारे २ लाख रूपयांचे नुकसान झाले. मात्र त्याच दिवशी घातपाताचा संशय व्यक्त करण्यात आला, तर घातपाताची चर्चा पाहता सर्वपक्षीय महापालिका पदाधिकाऱ्यांनी आगीच्या चौकशीची मागणी आयुक्तांकडे केली. आग लावून इमारत नादुरूस्त ठरवायची व शिकस्त म्हणून पाडून तेथे मॉलची उभारणी करावी, या हेतूने आग लावण्यात आल्याचा आरोप होता. त्याअनुषंगाने आयुक्तांनी १५ फेब्रुवारीस वानखडेंच्या नेतृत्वात त्रिसदस्यीय समिती नेमली. त्या समितीने या तीनही शाळेचे मुख्याध्यापक, सहायक शिक्षक, टाऊन हॉलचे शिपायांसह संबंधितांचे बयाण नोंदविले. पोलीस पंचनामा विचारात घेतला व त्यानंतर तेथील आग ज्वालाग्रही रासायनिक द्रव्यामुळे आग लागल्याचा प्राथमिक निष्कर्ष नोंदविण्यात आला आहे. शाळा कुलूपबंद केल्यानंतर ज्या ठिकाणी आग लागली. त्या प्रयोगशाळेच्या हॉलपर्यंत पोहोचणे शक्य नसल्याने व तेथील वीज पुरवठा खंडित असल्याने घातपाताची शक्यता नाकारण्यात आली आहे. या निष्कर्षामुळे घातपाताचा शक्यतोवर पडदा पडला आहे.
शाळेच्या प्रयोगशाळेत उंदरांचा सुळसुळाट
लालशाळेच्या प्रयोगशाळेत उंदरांची संख्या जास्त आहे. लाकडी वस्तू पण आहेत. प्रयोगशाळेत सल्फ्यूरिक आम्ल, हायड्रोक्लोरिक आम्ल, स्पिरीट, सोडियम सल्फेट, स्पिरीट ग्लिसरीन, सोडीयम यासारखी स्फोटक ज्वालाग्रही पदार्थ असल्याने आग लागण्याची शक्यता असू शकते, असा अंदाज तेथील विज्ञान शिक्षकांनी त्यांच्या अहवालात नोंदविला आहे.
असे झाले होते नुकसान
प्रयोगशाळेच्या मोठ्या हॉलसह आजूबाजूच्या दोन वर्गखोल्या खाक, आलमाºया २०, लोखंडी आलमारी ०२, लोखंडी ट्रंक ०१, रासायनिक साहित्य पूर्ण, मायक्रोस्कोप, टाईपरायटर जुने, प्रोजेक्टर जुना, एम्प्लीफायर, लाऊडस्पिकर, प्रात्यक्षिक साहित्य, दरवाजे, खिडक्या, स्टुल २०, टेबल ८, एकंदरीत संपूर्ण दोन्ही प्रयोगशाळा जळून नष्ट झाल्या.

Web Title: Due to the presence of flammable chemical, a fire in the red school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :fireआग