विद्यापीठात बिबट्याची दहशत पहाटे भ्रमंतीची गर्दी ओसरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2018 10:58 PM2018-12-31T22:58:50+5:302018-12-31T22:59:05+5:30

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ परिसरात बिबट्याची दहशत कायम आहे. पहाटे भ्रमंतीवर जाणाऱ्यांनी तलाव परिसराचा मार्ग बंद केला असून, हल्ली गर्दी ओसरली आहे. मात्र, प्रशासनाने सुरक्षेच्या अनुषंगाने अतिरिक्त सुरक्षा तैनात केली आहे.

Due to the scare of the university, the rush of crowd disappeared | विद्यापीठात बिबट्याची दहशत पहाटे भ्रमंतीची गर्दी ओसरली

विद्यापीठात बिबट्याची दहशत पहाटे भ्रमंतीची गर्दी ओसरली

Next
ठळक मुद्देसुरक्षा तैनात : तलाव परिसरात फिरण्यास मनाईचे फलक

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ परिसरात बिबट्याची दहशत कायम आहे. पहाटे भ्रमंतीवर जाणाऱ्यांनी तलाव परिसराचा मार्ग बंद केला असून, हल्ली गर्दी ओसरली आहे. मात्र, प्रशासनाने सुरक्षेच्या अनुषंगाने अतिरिक्त सुरक्षा तैनात केली आहे.
विद्यापीठ परिसरात बिबट्यांचा संचार ही नित्याचीच बाब आहे. मात्र, गत आठवड्यात गुरुवारी सकाळी १० ते १० वाजेच्या सुमारास बिबट्याने गाय फस्त केल्याची घटना निदर्शनास आली. त्यामुळे या घटनेनंतर विद्यापीठ प्रशासनाने खबरदारीच्या उपाययोजना केल्या आहेत. विद्यापीठाच्या मागील बाजूस विशेषत: तलाव परिसर मार्गाकडे धोक्याच्या ठिकाणी सूचना फलक लावण्याचे निर्देश कुलसचिव अजय देशमुख यांनी दिले आहे. त्यानुसार सुरक्षा विभागाने हालचाली सुरू केल्या आहेत. मात्र, धोकादायक ठिकाणाहून कोणीही मार्गक्रमण करू नये, यासाठी सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहे. ज्या भागात बिबट्याने शिकार केली, त्या भागात हरिण, काळवीट, रानडुक्करांचा वावर आहे. त्यामुळे बिबट विद्यापीठ परिसरात शिकारीच्या अनुषंगाने केव्हाही येऊ शकतो, अशी शक्यता वनविभागाने वर्तविली आहे. विद्यापीठाच्या तलाव परिसरात दोन बिबट असल्याने ट्रॅप कॅमेºयात कैद झाले आहे. मध्यंतरी बिबट मुलींच्या वसतिगृह परिसरापर्यंत येण्याची मजल गाठली होती, हे विसरून चालणार नाही. गत उन्हाळ्यात मार्डी मार्गालगतच्या कॉलनीत बिबट्याने कुत्र्याची शिकार केल्याची घटना देखील घडली आहे. त्यामुळे विद्यापीठ प्रशासनाने नागरिकांची जिवीत हानी होऊ नये म्हणून तलाव परिसरात पहाटे भ्रमंतीस मनाई केली आहे. प्रशासनाच्या या सूचनेला नागरिकांनी देखील प्रतिसाद देत या भागात ये-जा बंद केली आहे. ऐरव्ही तलाव परिसरात सतत असणारी वर्दळ बिबट्याच्या दहशतीने कमी झाल्याचे चित्र आहे.

विद्यापीठ परिसरात धोकादायक ठिकाणांवर सूचना फलक लवकरच लावले जातील. त्याअनुषंगाने कुलसचिवांनी निर्देश दिले आहे. मात्र, सुरक्षा रक्षकांच्या माध्यमातून धोकादायक ठिकाणांवर ये- जा करण्यास मज्जाव केला जात आहे. अतिरिक्त सुरक्षा रक्षक तैनात केले आहे.
- रवींद्र सयाम,
उपकुलसचिव, सुरक्षा विभाग

Web Title: Due to the scare of the university, the rush of crowd disappeared

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.