धक्का लागल्याच्या कारणावरून तरुणाची निर्घृण हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2018 11:00 PM2018-07-20T23:00:49+5:302018-07-20T23:01:15+5:30

धक्का लागल्याच्या क्षुल्लक कारणावरून एका आॅटोचालक तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. ही धक्कादायक घटना गुरुवारी रात्री १०.४५ च्या सुमारास सातुर्णा बसस्टॉपजवळ घडली. विजय लक्ष्मण गुर्जर (२२,रा. मायानगर) असे मृताचे नाव आहे.

Due to shock, the youth's murderous murder | धक्का लागल्याच्या कारणावरून तरुणाची निर्घृण हत्या

धक्का लागल्याच्या कारणावरून तरुणाची निर्घृण हत्या

Next
ठळक मुद्देतीन आरोपींना अटक सातुर्णा बसस्टॉपजवळील घटना

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : धक्का लागल्याच्या क्षुल्लक कारणावरून एका आॅटोचालक तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. ही धक्कादायक घटना गुरुवारी रात्री १०.४५ च्या सुमारास सातुर्णा बसस्टॉपजवळ घडली. विजय लक्ष्मण गुर्जर (२२,रा. मायानगर) असे मृताचे नाव आहे.
पोलीस सूत्रानुसार, रवि ऊर्फ टिंग्या नंदेश्वर (३० रा. सातुर्णा), गोलू ऊर्फ मनोज सावंत (२७, रा. पार्वतीनगर) व दीपक शंकर मारवाडी (२४, रा. वल्लभनगर) अशी आरोपींची नावे आहेत. राजापेठ पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली असून, त्यांना न्यायालयात हजर करून पोलीस कोठडीची मागणी केली. विजय गुर्जर हा आॅटोचालक आहे. गुरुवारी रात्री तो मित्राच्या आॅटोने सातुर्णा स्थित एका दुकानात दारु पिण्यासाठी गेला. दारू पिऊन परत बाहेर आल्यानंतर विजय हा रस्त्याच्या कडेला असणाऱ्या रवि नंदेश्वर यांच्या दर्शन स्नॅक्स हातगाडीवर गेला, तर त्याचा मित्र आॅटो आणण्यासाठी गेला. त्यावेळी स्नॅक्सच्या गाडीवर उपस्थित असलेला नंदेश्वरचा मित्र दीपक मारवाडीला विजयचा धक्का लागला. धक्का लागल्याच्या कारणावरून विजय व दीपकचा वाद उफाळून आला. वाद विकोपाला गेल्यानंतर दीपक, रवी व गोलू या तिघांनीही विजयवर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला चढविला. शस्त्राचे घाव विजयच्या कंबरेच्या खालच्या भागात लागल्याने तो जागीच पडला. दरम्यान त्याचा मित्र घटनास्थळी आला असता, विजय रक्तबंबाळ अवस्थेत आणि मारेकरी पलायन करताना दिसले. घटनास्थळी रक्ताचा सडा होता. या घटनेची माहिती राजापेठ पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी रवाना झाले. काही नागरिकांनी विजयला तत्काळ इर्विन रुग्णालयात नेले. तेथे डॉक्टरांनी विजयला मृत घोषित केले. पोलिसांनी घटनास्थळ गाठल्यानंतर घटनेची माहिती जाणून घेतली व आरोपींचा तत्काळ शोध सुरु केला. याप्रकरणात मृतक विजय गुर्जरचा भाऊ अजय याने पोलिसात तक्रार नोंदविली असून याप्रकरणात पोलिसांनी तिन आरोपींविरुध्द भादंविच्या कलम ३०२, ३४ अन्वये गुन्हा नोंदविला आहे.
अडीच तासांत आरोपी गजाआड
घटनेच्या माहितीवरून राजापेठचे पोलीस निरीक्षक किशोर सूर्यवंशी यांनी पोलीस उपनिरीक्षक व डीबी पथकाला तात्काळ शोधकार्यासाठी पाठविले. पोलीस पथकाने तात्काळ अ‍ॅक्शन घेत आरोपींचा शोध सुरू केला. हत्येनंतर आरोपी एका दुचाकीने पसार झाले होते. पोलिसांनी रवि नंदेश्वरला रविनगर, गोलू सावंतला सायस्कोर मैदानातून, तर दीपक मारवाडीला हिंदू स्मशानभूमीजवळून अटक केली. दोन ते अडीच तासांत आरोपींना गजाआड करण्यात राजापेठ पोलिसांना यश मिळाले.

Web Title: Due to shock, the youth's murderous murder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.