भरधाव बसने घेतला पेट, २० प्रवासी बचावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 10:56 PM2017-12-26T22:56:39+5:302017-12-26T22:57:24+5:30

चांदूरबाजारवरून भांडूमकडे जाणाऱ्या भरधाव एसटी बसला अचानक आग लागली. चालकाने प्रसंगावधान राखून वेळीच त्यावर नियंत्रण मिळविल्याने मोठी हानी टळली.

Due to the stomach, 20 passengers were saved | भरधाव बसने घेतला पेट, २० प्रवासी बचावले

भरधाव बसने घेतला पेट, २० प्रवासी बचावले

Next
ठळक मुद्देघटांगची घटना : मेळघाटात भंगार बसगाड्या

आॅनलाईन लोकमत
चिखलदरा : चांदूरबाजारवरून भांडूमकडे जाणाऱ्या भरधाव एसटी बसला अचानक आग लागली. चालकाने प्रसंगावधान राखून वेळीच त्यावर नियंत्रण मिळविल्याने मोठी हानी टळली. ही घटना मंगळवारी सायंकाळी वाजता घटांगनजीक घडली. मात्र या घटनेमुळे प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. दुसरीकडे या घटनेच्या पार्श्वभूमीवर मेळघाट सारख्या दुर्गम भागात चालविण्यात येणाऱ्या भंगार गाड्याचा मुद्दा एरणीवर आला आहे.
चांदूरबाजार आगारातील एमएच ४० एन ८६५६ क्रमांकाची बस परतवाडा घटांग मार्गे भांडूमसाठी जात होती. घटांगनजीक बसच्या इंजिनमध्ये अचानक आग लागली. आगीचे लोळ उठल्याने प्रवाशांनी एकच आरडाओरड केली. यावेळी बसमध्ये सुमारे २० प्रवाशी होते. चालक ठाकूर यांनी प्रसंगावधान राखून बस थांबविली व वाहक कोल्हारे यांनी प्रवाशांना बाहेर काढले. सतत धूर निघत असल्याने प्रवासी व गावकऱ्यांनी मिळेल ती भांडी घेऊन आगीवर नियंत्रण मिळविले. यामुळे मोठा अनर्थ टळला.
अपघाताची शक्यता
मेळघाटात परतवाडा आणि चांदूर बाजार आगाराच्या भंगार आणि नादुरुस्त बसगाड्या सतत पाठविल्या जात असल्याचे वारंवार सिद्ध झाले असताना, यातून मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे मत यावेळी प्रवाशांनी व्यक्त केले.

Web Title: Due to the stomach, 20 passengers were saved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.