पावसामुळे अमरावतीमध्ये ग्रामीण पोलीस भरती मैदानावर झाला चिखल; चाचणी रखडली

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2024 08:20 AM2024-06-21T08:20:06+5:302024-06-21T08:23:51+5:30

सकाळपासून मैदानी चाचण्या अजूनही रखडलेल्या आहेत. ग्रामीण पोलिसांकडून अजूनही विद्यार्थ्यांना भरती केव्हा चालू होईल याबाबत सूचना दिल्या नाहीत.

Due to yesterday's rain, there was mud at the rural police recruitment ground in Amravati | पावसामुळे अमरावतीमध्ये ग्रामीण पोलीस भरती मैदानावर झाला चिखल; चाचणी रखडली

पावसामुळे अमरावतीमध्ये ग्रामीण पोलीस भरती मैदानावर झाला चिखल; चाचणी रखडली

मनीष तसरे

अमरावती :सकाळ पासून मैदानी चाचण्या अजूनही रखडलेल्या आहेत. ग्रामीण पोलिसांकडून अजूनही विद्यार्थ्यांना भरती केव्हा चालू होईल याबाबत सूचना दिल्या नाहीत. त्यामुळे सकाळपासून विद्यार्थी ताटकळत बसलेले आहेत. पोलीस भर्ती स्थगित करून पावसाळ्या नंतर घेण्याची विद्यार्थ्यांची मागणी यावेळी उमेदवारांकडून करण्यात आली . पोलीस भरतीची अद्यापही शारीरिक चाचणी सुरू झालेली नाही, मोठ्या संख्येने उमेदवार ग्राऊंड बाहेर बसले आहेत. पोलीसांतर्फे अद्यापही विद्यार्थ्यांना सूचना देण्यात आल्या नाही.

 अमरावती शहर पोलीस आयुक्तालय तर्फे घेण्यात आलेल्या पोलीस भरती भरतीचे ग्राउंड काल झाकून ठेवण्यात आल्यामुळे त्यांचे ग्राउंड सुव्यवस्थित असल्याने ते सकाळपासून भरती घेऊ लागले.

Web Title: Due to yesterday's rain, there was mud at the rural police recruitment ground in Amravati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.