शिवघोषात दुमदुमली अंबानगरी

By Admin | Published: March 17, 2017 12:14 AM2017-03-17T00:14:02+5:302017-03-17T00:14:02+5:30

शिवसेना महानगरच्या वतीने बुधवारी काढण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या शोभायात्रेने संपूर्ण अंबानगरी शिवमय झाली होती.

Dumdumbali Ambanagari in Shiva Ghosh | शिवघोषात दुमदुमली अंबानगरी

शिवघोषात दुमदुमली अंबानगरी

googlenewsNext

शिवसेनेची शोभायात्रा : महानगरात शिवजयंती साजरी
अमरावती : शिवसेना महानगरच्या वतीने बुधवारी काढण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या शोभायात्रेने संपूर्ण अंबानगरी शिवमय झाली होती. अंबागेट मधून प्रारंभ झालेल्या शोभायात्रेचे जवाहर गेटजवळ विर्सजन झाले. शिवसेना महानगर शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने छत्रपतींच्या जयंती निमित्त भव्य- दिव्य शोभायात्रा काढण्यात आली.
सायंकाळी ५.३० वाजता अंबागेट मधून या शोभायात्रेला प्रारंभ झाला. खा. आनंदराव अडसूल, महानगर प्रमुख सुनील खराटे, जिल्हा प्रमुख संजय बंड यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या भव्य प्रतिमेचे पूजन करुन शोभायात्रेला सुरुवात झाली. अमरावती व यवतमाळ येथील नामवंत ढोल पथकाशिवाय अकोटचे उत्कृष्ट दिंडी पथक, मुलींचे लेझीम येथील नामंवत व बॅँकपथक शोभायात्रेचे प्रमुख आकषण होते. शोभायात्रा अंबागेट, गांधी चौक, राजकमल चौक, शाम चौक, जयस्तंभ चौक, सरोज चौक, प्रभात चौक मार्गे अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने मार्गभ्रमण करीत शेवटी जवाहर नगर येथे शोभायात्रा विसर्जित झाली. शोभायात्रेचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. काही ठिकाणी शिवसैनिकांनी पाणी व शरबत वाटप केले.
या शोभायात्रेला खा. आनंदराव अडसूळ, महानगर प्रमुख सुनील खराटे जिल्हा प्रमुख संजय बंड, प्रशांत वानखडे, राजेश वानखडे, नरेंद्र केवले आशीष पुरोहित, परेश भंसाली, विकास शेळके, दिनेश चौधरी, उमेश वाठ, प्रकाश तेटू, देवा वेळुकार, विक्की गुहे, दिगंबर मानकर, पंजाबराव तायवाडे, भारत चौधरी, राजेंद्र तायडे, दिनेश गहलोत, प्रशांत जाधव, पराग गुडधे, महिला आघाडीच्या शोभा गायकवाड, वर्षा भोयर, मनीषा टेंभरे, रेखा खारोडे, प्रणिता खराटे, श्रद्धा गहलोत, प्रतिभा बोपशेट्टी, मंजुषा जाधव, पीयू ठाकूर, विजय खंडारे, नीलेश सावळे, राजू अक्कलवार, प्रकाश बांते, संदीप इंगोले, प्रकाश मंजलवार, राहूल माटोडे आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Dumdumbali Ambanagari in Shiva Ghosh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.