फळ भाजीबाजारात घाणीचे साम्राज्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2018 10:32 PM2018-07-06T22:32:20+5:302018-07-06T22:32:37+5:30
येथील फळ व भाजीबाजारात हजारो क्विंटल फळे व भाजीपाल्याची रोज लिलाव करण्यात येतो. याठिकाणी दिवसभर कोट्यवधी रूपयांच्या फळे व भाजीपाल्याची उलाढाल होत असते. मात्र या ठिकाणी फेकुन दिलेला भाजीपाल्याने घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. यातून येथील व्यापारी व नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : येथील फळ व भाजीबाजारात हजारो क्विंटल फळे व भाजीपाल्याची रोज लिलाव करण्यात येतो. याठिकाणी दिवसभर कोट्यवधी रूपयांच्या फळे व भाजीपाल्याची उलाढाल होत असते. मात्र या ठिकाणी फेकुन दिलेला भाजीपाल्याने घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. यातून येथील व्यापारी व नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.
बाजार समितीने सदर साफसफाईचा कंत्राट क्षितीज बेरोजगार संस्थेला दिला आहे. स्वच्छतेसाठी महिन्याकाठी १ लाख १९ हजार रूपये सदर संस्थेला देण्यात येत असल्याची माहिती प्रभारी सचिव भुजंग डोईफोडे यांनी दिली.
परंतु सदर कंत्राटदाराने नेमलेल्या स्वच्छताकामगारांकडून नियमित स्वच्छता करण्यात येत नसल्याने या ठिकाणी अस्वच्छतेची परिस्थिती उद्धभवली आहे. येथे प्रचंड घाण होत असल्याने या ठिकाणी दुर्गंधी पसरत आहे. त्याकारणाने नियमित स्वच्छता करणे गरजेचे आहे. याठिकाणी नोंदणीकृत फळेविक्रेत्यांची ७८ दुकाने असून भाजीपाला विक्रेत्यांची नोंदणीकृत २७८ दुकाने आहेत. येथे दिवसभर कोट्यवधी रूपयांची उलाढाल होते. पण अनेक दुकानदार कचरा व सडलेला भाजीपाला हा कंटेनरमध्ये न टाकता उघड्यावरच फेकून देण्याचा प्रताप व्यापारीच करतात . तसेच कंत्राटदाराच्यावतीने नियमित स्वच्छता केल्यास यावर नियंत्रण मिळू शकते. येथे ये- जा करणाऱ्या व्यावसायिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. सडलेला भाजीपाला व फळे उघड्यावर फेकून दिली जात असल्याची वस्तुस्थिती आहे.
महिन्याकाठी स्वच्छतेवर १ लाख १९ हजार रूपये खर्च करण्यात येतात. कंत्राटदारकडून नियमित स्वच्छता करण्यात येत नसेल तर तपासून पुढील कारवाई करण्यात येईल.
-भुजंग डोईफोडे
प्रभारी सचिव, बाजार समिती