आश्रमातील अवैध सागवान चव्हाणांच्याच काळातील

By admin | Published: September 28, 2016 12:10 AM2016-09-28T00:10:37+5:302016-09-28T00:10:37+5:30

पिंपळखुटा आश्रमाच्या हद्दीत अवैध सागवानाच्या लाकडांचा साठा जप्त करण्यात आला होता....

During the time of Chavan of the ashram, | आश्रमातील अवैध सागवान चव्हाणांच्याच काळातील

आश्रमातील अवैध सागवान चव्हाणांच्याच काळातील

Next

हीच का भक्ती ? : पुण्यातून येऊन विदर्भात दंडेली
अमरावती : पिंपळखुटा आश्रमाच्या हद्दीत अवैध सागवानाच्या लाकडांचा साठा जप्त करण्यात आला होता. वनखात्याने केलेल्या या कारवाईत सुमारे तीन ट्रक सागवान जप्त करण्यात आले होते. विश्वशांती आणि लोककल्याणासाठी चालविल्या जाणाऱ्या पिंपळखुटा येथील शंकर महाराज यांच्या आश्रमात जो लाकूडफाटा जप्त करण्यात आला होता, त्या काळात दादा चव्हाण यांचाच आश्रमात दबदबा होता.
आश्रमात जप्त करण्यात आलेला अवैध सागवानसाठा वडळी वनकार्यालयात ठेवण्यात आला होता. या गंभीर प्रकरणी वनखात्याने गुन्हेदेखील दाखल केले होते. शंकर महाराज आणि ट्रस्टी यांना अटक होण्याची चिन्हे होती. त्याकाळी एका लालदिवाधारक राजकीय हस्तीचे वजन वापरून ही कारवाई प्रभावित करण्यात आली. वनखात्याचे जुने दस्तऐवज पडताळून बघितल्यास या कारवाईसंबंधीचे गांभीर्य पोलीस यंत्रणेला कळून येईल.
यावेळी करण्यात आली तशीच दंडेली शंकर महाराजांच्या आश्रमातील पदाधिकाऱ्यांनी त्याकाळीदेखील केली होती. वनगुन्हे दाखल झाल्यावर त्या गुन्ह्यांच्या मुळाशी जाण्यासाठी मदत करण्याऐवजी प्रकरणावर प्रकाश टाकला जाऊ नये यासाठीच ऊर्जा खर्ची घालण्यात आली होती. दादा चव्हाण नावाचे गृहस्थ त्याकामी अग्रभागी होते.
मुद्दा असा उपस्थित होतो की, पुण्याचे एक गृहस्थ त्यांचा तेथील कारभार सोडून महिनोगिनती अमरावती जिल्ह्यातील आश्रमात राहतात. प्रस्थ निर्माण करतात. अवैध कामे त्यांच्या कार्यकाळात आश्रमात घडून येतात. धार्मिक वलयाचा वापर करून तशा कामांना ही व्यक्ती समर्थन देते. नियमबाह्य कामांचा आग्रह धरताना बेकायदा मार्गाचा अवलंब करते. संपन्न पुण्यातून विकसनशील विदर्भात येऊन ही व्यक्ती हे सर्व भक्तीसाठी करत असेल काय? ज्या गुरुंच्या नावाने ही भक्ती प्रदर्शित केली जाते त्या गुरुंना अशी भक्ती अपेक्षित असेल काय?
दादा चव्हाण या व्यक्तिमत्त्वाभोवती गूढ निर्माण झाले आहे. आश्रमात घडलेल्या नरबळी प्रकरणाच्या अनुषंगाने त्यांच्या ुकुटुंबियांच्या नावाचा उल्लेख झाला आहे. वास्तव्याचे मूळ ठिकाण सोडून आयुष्यातील अनेक महत्त्वाची वर्षे पिंपळखुट्याच्या आश्रमात घालविताना दादा चव्हाण यांचा नेमका हेतू तपासणे हे प्रथमेश आणि अजय नरबळी प्रकरणाच्या अनुषंगाने महत्त्वाचे आहे.
आश्रमात ज्यावेळी सागवान लाकूड जप्त करण्यात आले होते, त्या लाकडांचा व्यास भुवया उंचावणारा होता. दीड फुटाची पाटी निघू शकेल, असे त्याचे आकारमान होते. अमरावतीच्या जंगलातून निर्माण झालेले ते लाकूड नव्हते. यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजीच्या जंगालातून ते आणण्यात आले होते, अशी माहिती वनखात्याची आहे. सागवान एकदाच पकडण्यात आले असले तरी घाटंजीच्या जंगलातून अवैध लाकूड आणणे आणि एका शेतात उपलब्ध करविलेल्या छोट्या आरामशीनीवर ते कापणे, हा तस्करीचा प्रकार नियमित सुरू असल्याची आणि चोरीची लाकडे यापद्धतीने बऱ्याच काळापासून विकली जात असल्याची वनखात्याची माहिती होती. त्याअनुषंगाने छापा मारून भलामोठा लाकूडसाठा जप्त करण्यात आला होता. वनखात्याच्या माहितीवर झालेले ते शिक्कामोर्तबच होते. आश्रमाशी जुळलेल्या परंतु सागवानाच्या अवैध व्यवहारात हातखंडा असलेल्या शेखर पलकंडवार या व्यक्तीचे नाव विशेषत्त्वाने पुढे आले होते. ही व्यक्ती आश्रमाशी घनिष्टपणे जुळलेली होती. चव्हाण यांच्या प्रभावकाळात घडलेला हा गंभीर गुन्हा पुन्हा खोदून काढल्यास पोलिसांना, गुप्तचर खात्याला इतर काही महत्त्वाच्या मुद्यांपर्यंत पोहचता येईल.

Web Title: During the time of Chavan of the ashram,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.