वर्षभरात सायबर गुन्हेगारांनी ७९ लाखांनी गंडविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:14 AM2021-03-26T04:14:35+5:302021-03-26T04:14:35+5:30

अमरावती/ संदीप मानकर दिवसेंदिवस ऑनलाईन फसवणुकीचे गुन्हे वाढत आहे. एकीकडे अँन्ड्राॅईड सेलफोन नागरिकांना फायद्याचा ठरला, तर याच फोनमध्ये विविध ...

During the year, cyber criminals spent Rs 79 lakh | वर्षभरात सायबर गुन्हेगारांनी ७९ लाखांनी गंडविले

वर्षभरात सायबर गुन्हेगारांनी ७९ लाखांनी गंडविले

Next

अमरावती/ संदीप मानकर

दिवसेंदिवस ऑनलाईन फसवणुकीचे गुन्हे वाढत आहे. एकीकडे अँन्ड्राॅईड सेलफोन नागरिकांना फायद्याचा ठरला, तर याच फोनमध्ये विविध प्रकारचे ॲप्स डाऊनलोड करण्यास सांगून नागरिकांना गंडविल्याचा प्रकार वाढीस लागला आहे. सन २०२० मध्ये ६७ गुन्हे सायबर पोलिसांकडे नोंदविले गेले. यातून ७८ लाख ६६ हजार ८६७ रुपयांनी नागरिकांची आर्थिक फसवणूक झाल्याचे उघड झाले.

पोलिसांनी या प्रकरणाचा तांत्रिक तपास करून पाच गुन्हे उघडकीस आणले. यात १६ लाख ४८ हजार ६७ रुपये परत मिळवून ते नागरिकांना परत केले आहे. २०२१ मध्ये गत तीन महिन्यांत ऑनलाईन व इतर फसवणुकीचे पाच गुन्हे दाखल झाले. यात १० लाख ७५ हजार ५०५ रुपयांनी लोकांची फसवणूक सायबर गुन्हेगारांनी केली. त्यापैकी पोलिसांनी तपास करून २ लाख ६७ हजार रुपये नागरिकांना परत मिळवून दिले.

बॉक्स

सोशल मीडिया व इतर १३ गुन्हे

फेसबुक, व्हॉट्सॲप व इतर सोशल मीडियावर मुलींशी मैत्री करून त्यांचे आक्षेपार्ह फोटोे शेअर करून बदनामी करणे, सोशल मीडियावर पाठलाग करून विनयभंग करणे, फेक अकाऊंट तयार करणे असे एकूण ९ गुन्हे दाखल झाले. इतर ४ गुन्ह्यांची नोंद यंदा सायबर पोलिसांकडे झाली आहे. त्यापैकी पाच गुन्हे उघड झाल्याची माहिती सायबर सेलच्या पोलीस निरीक्षक सीमा दाताळकर यांनी दिली.

महिना गुन्हे

जानेवारी -५

फेब्रुवारी-८

मार्च -४

एप्रिल-६

मे- ६

जून ५

जूलै- १५

ऑगस्ट-७

सप्टेंबर -११

ऑक्टोंबर -८

नोव्हेंबर -२

डिसेंबर -३

एकूण-८०

बॉक्स:

सायबर सेलमध्ये मनुष्यबळाचा अभाव

सायबर गुन्हेगारी झपाट्याने वाढत आहे. त्याला आळा घालण्यासाठी पोलिसांच्यावतीने नेहमीच जनजागृती करून नागरिकांना मोबाईल हाताळताना सतर्क करण्यात येते. मात्र, ऑनलाईन खरेदी करताना फसवणूक होत आहे. सायबर सेलकडे वाढते गुन्हे लक्षात घेता रिक्त पदे जरी नसली तरी कामाचा ताण बघता येथे ३० टक्के कर्मचाऱ्यांचा अभाव असल्याची माहिती आहे. येथे एक पीआय, एक एपीआय, एक पीएसआय व इतर १५ जणांची टीम कार्यरत आहे.

सीपींचा कोट आहे.

Web Title: During the year, cyber criminals spent Rs 79 lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.