वर्षभरात गॅस सिलिंडर २५० ने वाढले, सबसिडी मात्र कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:11 AM2021-07-17T04:11:25+5:302021-07-17T04:11:25+5:30

बजेट कोलमडले; ग्रामीण भागात पुन्हा चुली पेटू लागल्या अमरावती : गेल्या वर्षभरापासून आजपर्यंत घरगुती गॅस २५० रुपयांनी महागला आहे. ...

During the year, gas cylinders increased by 250, but subsidies decreased | वर्षभरात गॅस सिलिंडर २५० ने वाढले, सबसिडी मात्र कमी

वर्षभरात गॅस सिलिंडर २५० ने वाढले, सबसिडी मात्र कमी

Next

बजेट कोलमडले; ग्रामीण भागात पुन्हा चुली पेटू लागल्या

अमरावती : गेल्या वर्षभरापासून आजपर्यंत घरगुती गॅस २५० रुपयांनी महागला आहे. यामुळे महिला वर्गाची डोकेदुखी वाढली आहे. गत वर्षभरात २५० रुपयांनी गॅस भडकला जून महिन्यात ८३४ रुपयांना मिळणारे गॅस सिलिंडर जुलै महिन्यात ८६० रुपयांवर पाेहोचले आहे. लॉकडाऊनमध्ये पैशाची आवक होत ठप्प असतानाच गॅसची महागाई होरपळून काढत आहे. काटकसरीबाबत गृहिणी संवेदनशील बनल्या आहेत. स्वयंपाक, चहा अशा कामांसाठीच गॅस वापरून अन्य कामासाठी चुलीचा वापर होत केला जात आहे. आंघोळीचे पाणी तापविण्यसाठी तसेच जास्त सदस्यांच्या स्वयंपाकासाठी सरपणाचा वापर होत आहे. उज्ज्वला योजनेची लाभार्थींनी नवा सिलिंडर घेणेच बंद केले आहे.

बॉक्स

आता चुलीशिवाय पर्याय नाही

कोट

गॅसच्या दरवाढीने घरखर्चात वाढ झाली आहे. गॅसच्या बचतीसाठी प्रयत्न करावे लागतात. पाणी तापविण्याच्या कामासाठी गॅसचा वापर बंद केला आहे. स्वयंपाकासाठी वापर करताना गॅसचा वापर आता चैनीची बाब ठरू लागली आहे.

- शोभा कावरे, गृहिणी

कोट

लॉकडाऊनमध्ये लोकांना दिलासा देण्याऐवजी महागाईत लोटण्याचे काम सरकार करीत आहे. व्यवसाय बंद असल्याने उत्पन्न कमी झाले आहे. पेट्रोलसोबत गॅस दरवाढीने सर्वसामान्य कुटुंबाचा खर्च वाढत आहे. अनावश्यक खर्चाला कात्री लावून महिन्याचे बजेट कोलमडले आहे. सरकार यावर विचार करणार की नाही, हा प्रश्न आहे.

- मंजूषा गावंडे, गृहिणी

बॉक्स

महिना गॅस सिलिंडरचे दर सबसिडी

जुलै २०२० ६१६ १३.१९

ऑगस्ट ६१८.५० १५.६९

सप्टेंबर ६१९ १६.१९

ऑक्टोबर ६१९ १६.१९

नोव्हेंबर ६१९ १६.१९

डिसेंबर ६६९ १६.१९

................................

जानेवारी २०२१ ७१९ १६.१९

फेब्रुवारी ८१९ १६.१९

मार्च ८४४ १६.१९

एप्रिल ८३४ १६.१९

मे ८३४ १६.१९

जून ८३४ १६.१९

जुलै २०२१ ८६० १६.१९

Web Title: During the year, gas cylinders increased by 250, but subsidies decreased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.