अमरावती जिल्ह्यातल्या कन्येची कर्तबगारी; अफगाणिस्तानातून १२९ भारतीयांना सुरक्षितपणे आणले मायदेशात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 03:19 PM2021-08-17T15:19:30+5:302021-08-17T15:20:17+5:30

तालिबानने अफगाणिस्तानवर केलेल्या चढाईनंतर तेथील नागरिकांना सुरक्षितपणे हलवण्याच्या कारवायांमध्ये अमरावती जिल्ह्यातल्या दर्यापूर येथील एका कन्येने आपले कर्तृत्व व राष्ट्रप्रेम सिद्ध केले असून, तिने १२९ भारतीयांना सुरक्षित मायदेशी परत आणले आहे.

Duties of Amravati girl; 129 Indians safely repatriated from Afghanistan | अमरावती जिल्ह्यातल्या कन्येची कर्तबगारी; अफगाणिस्तानातून १२९ भारतीयांना सुरक्षितपणे आणले मायदेशात

अमरावती जिल्ह्यातल्या कन्येची कर्तबगारी; अफगाणिस्तानातून १२९ भारतीयांना सुरक्षितपणे आणले मायदेशात

googlenewsNext



लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: तालिबानने अफगाणिस्तानवर केलेल्या चढाईनंतर तेथील नागरिकांना सुरक्षितपणे हलवण्याच्या कारवायांमध्ये अमरावती जिल्ह्यातल्या दर्यापूर येथील एका कन्येने आपले कर्तृत्व व राष्ट्रप्रेम सिद्ध केले असून, तिने १२९ भारतीयांना सुरक्षित मायदेशी परत आणले आहे.
दर्यापूरची रहिवासी असलेल्या श्वेता चंद्रकांत शंके ही कन्या २०१७-१८ मध्ये इंडियन एअरलाईन्समध्ये एअरहोस्टेसपदी रुजू झाली होती. अफगाणिस्तानातील भारतीयांना परत आणण्यासाठी गेलेल्या विमानात ती तैनात होती.
तिचे वडील सेवानिवृत्त शिक्षक असून, बहीण व भाऊ वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहेत.

Web Title: Duties of Amravati girl; 129 Indians safely repatriated from Afghanistan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.