अवकाळीग्रस्तांच्या मागे सरकार खंबीरपणे उभं - उपमुख्यमंत्री फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2023 03:36 PM2023-04-10T15:36:27+5:302023-04-10T15:55:28+5:30

अकोला मंदिर दुर्घटनेतील जखमींचा खर्च सरकार करणार, मृतांच्या कुटुंबीयांना मदत करणार

dy cm devendra fadnavis announces financial aid for farmers hit by unseasonal rain | अवकाळीग्रस्तांच्या मागे सरकार खंबीरपणे उभं - उपमुख्यमंत्री फडणवीस

अवकाळीग्रस्तांच्या मागे सरकार खंबीरपणे उभं - उपमुख्यमंत्री फडणवीस

googlenewsNext

अमरावती : गेल्या दोन दिवसापासून गारपीट आणि वादळी वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसाने अक्षरश: थैमान घातलयं. पिकांची अतोनात नासाडी झाली असून हातातोंडाशी आलेला घास हिरावल्याने शेतकऱ्यांवर मोठं संकट कोसळलं आहे. अमरावती विभागात ७ हजार ४०० हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं आहे. याचे पंचनामे झाले सुरू असून शेतकऱ्यांना तत्काळ मदत दिली जाईल असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज अमरावती दौऱ्यावर आले असता त्यांनी अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या भागाचा आढावा घेतला. अमरावती, अकोला बुलढाणा, यवतमाळ, वाशिम या पाच जिल्ह्यांमध्ये २४२ अवकाळी पावसाने बाधित झाली आहेत. यात बाधित शेतकऱ्यांची संख्या ७५९६ इतकी असून याचे पंचनामे सुरू झाले आहेत. ३२४३ हेक्टरचे पंचनामे पूर्ण झाले असून उर्वरित लवकरच पूर्ण होतील, असे फडणवीस म्हणाले. अवकाळीग्रस्त सर्व शेतकऱ्यांच्या मागे सरकार खंबीरपणे उभं असून सर्वांना मदत दिली जाईल, असं फडणवीस यांनी सांगितलं. 

गेल्या कॅबिनेटमध्ये सततच्या पावसाने होणारे नुकसान किंवा अवकाळीने होणाऱ्या नुकसान भरपाई देण्यासंदर्भातला निर्णय घेण्यात आला आहे. सध्या राज्यात सातत्याने वातावरणातील बदलामुळे एक वेगळं निसर्गचक्र आपल्याला पाहायला मिळत आहे. यात काही गावं तर कुठे तालुका बाधित होत आहे. अमरावती विभागात तीन वेळा अशी आपत्ती आली असून गेल्या दोन्ही आपत्तींच्या संदर्भात पंचनामे पूर्ण करून आपण मदतीला पात्र केलं आहे. याही संदर्भात पंचनामे पूर्ण करून मदत करू, अवकाळीग्रस्तांच्या मागे सरकार खंबीरपणे उभं आहे असं फडणवीस म्हणाले.

अकोला जिल्ह्यातील पारस येथे मंदिरावर झाड पडून झालेल्या दुर्घटनेत ७ जणांचा मृत्यू व ३५ जण जखमी झाले. त्या सर्व जखमींचा खर्च शासनाच्या वतीने केला जाणार असून दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना मदत करण्यात येईल असंही फडणवीस यांनी सांगितलं.

Web Title: dy cm devendra fadnavis announces financial aid for farmers hit by unseasonal rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.