जिल्ह्यातील ८१ रेतीघाटांचा ई-लिलाव
By admin | Published: January 10, 2015 10:45 PM2015-01-10T22:45:39+5:302015-01-10T22:45:39+5:30
जिल्ह्यातील ८१ रेतीघाटांचा लिलाव ई-प्रक्रियेद्वारे २० जानेवारी रोजी होणार असून १ लाख ९ हजार ५९३ ब्रासमधून ३१ कोटी ९६ लाख ९५ हजार रूपयांचे उत्पन्न मिळणार आहे.
मोहन राऊत - अमरावती
जिल्ह्यातील ८१ रेतीघाटांचा लिलाव ई-प्रक्रियेद्वारे २० जानेवारी रोजी होणार असून १ लाख ९ हजार ५९३ ब्रासमधून ३१ कोटी ९६ लाख ९५ हजार रूपयांचे उत्पन्न मिळणार आहे.
धामणगाव तालुक्यातील वर्धा नदीमध्ये सर्वाधिक ७ रेतीघाट आहेत. यातून ४९ हजार ५२३ ब्रास रेतीच्या उत्खननाला परवानगी मिळणार असून २१ कोटी ५४ लाख ५१ हजार ८७४ रूपयांचा महसूल एकट्या धामणगाव तालुक्याकडून मिळणार आहे़ भातकुली तालुक्यात रेतीघाट असून ५ हजार ८७५ एकूण ब्रास रेतीचा लिलाव ई-प्रक्रियेव्दारे करण्यात येणार येणार आहे.
लिलावासाठी आॅनलाईन नोंदणी
५३ लाख ६३ हजार १५ रूपये मिळणार आहे़ तिवसा तालुक्यात सात रेती घाटांचा लिलाव होऊन शासनाला ५ कोटी ९२ लाख २९ हजार ३३५ रूपयांचा महसूल प्राप्त होणार आहे़
दर्यापूर तालुक्यात २८ घाटांचा लिलाव होणार आहे़ २०,१५२ ब्रासमधून शासनाला २ कोटी १४ लाख ५२,६१७ रूपये मिळणार आहे़ अंजनगाव तालुक्यातील ३ रेतीघाटांची अपसेट प्राईज २४ लाख ६६,६३३ रूपये ठेवण्यात आली आहे़ नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील ३ रेतीघाटांची किंमत २ कोटी ५८ लाख ७,८६० रूपये आहे़ चांदूरबाजार तालुक्यातील चार रेतीघाटाची किंमत १ कोटी ६३ लाख ८०५८ रूपये आहे़ धारणी तालुक्यातील ७ रेत घाटांच्या लिलावाची अपसेट प्राईज ३२ लाख ७० हजार ३४४ ठेवण्यात आली आहे़ जिल्ह्यातील वर्धा नदीकाठावरील घाट तसेच पूर्णानगर, भातकुली, चाकूर, दाऊतपूर, हिंमतपूर, वातोंडा, भारवाडी, जावरा, फत्तेपूर, चांदूर ढोरे, निंबा, वासेवाडी, तळणी पूर्णा,तामसवाडी, बाजीतपूर, सावळापूर, वडगाव, येसुर्णा, येलकी, देऊतवाडा, शिवारा, निंभार्णी, उंबरखेड, धामंत्री, यासह अन्य घाटांचा लिलाव होईल.