अमरावतीत लवकरच धावणार ई-बसेस, केंद्र शासनाकडून ५० बस मंजूर

By गणेश वासनिक | Published: November 3, 2023 08:07 PM2023-11-03T20:07:25+5:302023-11-03T20:08:35+5:30

पर्यावरण समृद्धीच्या दिशेने एक पाऊल पुढे, सुसज्ज बस डेपो चार्जिंग स्‍टेशनसह हाेणार विकसित

E-buses will run in Amravati soon, 50 buses approved by central government | अमरावतीत लवकरच धावणार ई-बसेस, केंद्र शासनाकडून ५० बस मंजूर

अमरावतीत लवकरच धावणार ई-बसेस, केंद्र शासनाकडून ५० बस मंजूर

अमरावती : अमरावती महानगरातील रस्त्यांवर येत्या काही महिन्यातच ई बसेस धावणार आहे. केंद्र शासनाच्या राष्‍ट्रीय शहरी व आवासन मंत्रालयाने ५० बस मंजूर केल्या असून, सार्वजनिक वाहतुकीसाठी त्या सज्ज़ असतील. मेट्रोपॉलिटीन शहराच्या धर्तीवर आता अमरावतीत सुद्धा पर्यावरण समृद्धीच्या दिशेने एक पाऊल पुढे वाटचाल सुरू झाल्याचे चित्र आहे.

केंद्र शासनाचे राष्‍ट्रीय शहरी व आवासन मंत्रालयाचे १ सप्टेंबर २०२३ रोजीच्या पत्रान्‍वये देशातील सर्वसामान्‍य नागरिकांसाठी सार्वजनिक वाहतुकीकरीता वापरण्‍यात येणाऱ्या बसेसमध्‍ये इलेक्ट्रिक बसेसचा वाटा वाढविण्‍यात आला आहे. याच हेतूने केंद्र शासनाने पीएम ई बस सेवा योजना सुरु केली असून त्‍यामध्‍ये प्रथम टप्‍प्‍यात अमरावती महानगरपालिकेचा समावेश करण्‍यात आला आहे. आयुक्‍त देविदास पवार यांच्‍या अथक पाठपुराव्याने खासदार नवनीत राणा, खासदार डॉ. अनिल बोंडे यांच्‍या विशेष प्रयत्‍नाने नागरीकांच्‍या सेवेकरीता ई-बस महानगरपालिकेला प्राप्‍त होणार आहे.

बदलत्या काळानुसार सार्वजनिक वाहतूक सुविधांमध्ये बदल होणे अपेक्षित आहे. त्यानुसार केंद्र शासनाकडे ई- बसेसची मागणी
करण्यात आली होती. ती मंजूर झाली असून, लवकरच या अद्यावत ई-बसेस अमरावती शहराच्या रस्त्यावर धावतील. ही नागरिकांसाठी मोठी उपलब्धी ठरणारी आहे.
- देविदास पवार, आयुक्त, महानगरपालिका

Web Title: E-buses will run in Amravati soon, 50 buses approved by central government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.