तिवस्यातील घरकुलासाठी ई-क्लासची जागा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 10:55 PM2018-06-22T22:55:09+5:302018-06-22T22:55:32+5:30
प्रधानमंत्री आवास योजनेत नाव, मात्र जागा नसलेल्या तिवसा नगरपंचायत क्षेत्रातील घरकुल लाभार्थींना ई-क्लास जमिनीमधून जागा उपलब्ध करून देण्यासह इतरही विषयांवर आ. यशोमती ठाकूर यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांच्याशी चर्चा केली. जिल्हाधिकाऱ्यांनी त्यावर त्रिसदस्यीय समितीचा तोडगा काढला आहे.
तिवसा : प्रधानमंत्री आवास योजनेत नाव, मात्र जागा नसलेल्या तिवसा नगरपंचायत क्षेत्रातील घरकुल लाभार्थींना ई-क्लास जमिनीमधून जागा उपलब्ध करून देण्यासह इतरही विषयांवर आ. यशोमती ठाकूर यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांच्याशी चर्चा केली. जिल्हाधिकाऱ्यांनी त्यावर त्रिसदस्यीय समितीचा तोडगा काढला आहे.
लाभार्थींना ई-क्लास जमिनीतून जागा व ओबीसींना घरकुल मिळण्याबाबत आ. यशोमती ठाकूर यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली. पंचायत समिती अंतर्गत संबंधित ग्रामपंचायतींनी ठराव घेऊन संबंधित लाभार्थींना घरकुलासाठी जागा उपलब्ध करण्यात येईल, याविषयी जिल्हाधिकाऱ्यांनी आश्वस्त केले. त्वरेने प्रकरणाचा निपटारा होण्यासाठी उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, व खंडविकास अधिकारी यांची समिती स्थापित करण्यात आली आहे.
तिवसा येथील नवीन पाणीपुरवठा योजनेच्या अंदाजपत्रकासंदर्भात मजीप्राच्या कार्यकारी अभियंता श्वेता बॅनर्जी यांच्याशी जिल्हाधिकाऱ्यांनी चर्चा केली. अमरावती तालुक्यातील वाघोलीच्या ६० लाभार्थींनादेखील ई-क्लासची जागा उपलब्ध करण्याची मागणी आ. ठाकूर यांनी केली. गुरुकुंजात स्मशानभूमी रस्त्याच्या दुरुस्तीकडेही त्यांनी लक्ष वेधले. यावेळी वैभव वानखडे, लुकेश केने, मुकंद देशमुख, बबलू मक्रमपूरे, प्रशांत काळबांडे, पंकज साखरकर, संदीप झाडोकर, पवन काळमेघ, विवेक तायडे, रोशन वानखडे उपस्थित होते.