महाआवास योजनेअंतर्गत ई गृहप्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:09 AM2021-06-18T04:09:31+5:302021-06-18T04:09:31+5:30
३०० लाभार्थी हे भूमिहीन होते. यातील सव्वाशे लाभार्थ्यांना सरकारी ई क्लास व एफ क्लास जमिनी गावठाण विस्तार करून मोफत ...
३०० लाभार्थी हे भूमिहीन होते. यातील सव्वाशे लाभार्थ्यांना सरकारी ई क्लास व एफ क्लास जमिनी गावठाण विस्तार करून मोफत घरकुलसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. दुसऱ्या टप्प्यात दीडशे लाभार्थीना मोफत जमीन उपलब्ध होणार आहे. यात जिल्ह्याच्या पालकमंत्री ना. ॲड. यशोमतीताई ठाकूर यांनी विशेष प्रयत्न केले आहे.
यासोबतच कमी जागा असल्यास दुमजली घर बांधकाम गृहसंकुलसारखे प्रयोग यशस्वी करण्यात आले. त्याच सोबत दीनदयाळ उपाध्याय जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेअंतर्गत ५०,००० पर्यंत अनुदानाचा लाभही गरजू लाभार्थीना देण्यात आला. अभियान काळात वडिलोपार्जित जमीन रक्ताच्या नात्यात घरकुल लाभार्थींना बक्षीसपत्राद्वारे देण्यासाठी विशेष शिबिर दुय्यम निबंधक कार्यालय व पंचायत समितीच्या माध्यमातून घेण्यात आले असून, यात ३५० लाभार्थींना बक्षीसपत्रद्वारे घरकुलासाठी जमीन उपलब्ध झाली. बचत गटामार्फत घरकुल बांधकामासाठी आवश्यक वस्तूंचे घरकुल मार्टमध्ये राज्यात तिवसा तालुक्याने आघाडी घेतली आहे. पंचायत समिती, तिवसा घरकुल विभाग यांनी गटविकास अधिकारी डॉ. चेतन जाधव यांच्या मार्गदर्शनात नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून सदर अभियानमध्ये उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. गवंडी प्रशिक्षण, उमेद, मग्रारोहयो, सौभाग्य योजना, उज्ज्वला योजना, जलजीवन मिशन स्वच्छ भारत अभियान या अनेक योजनांचा कृती संगम महाआवास अभियानामध्ये करण्यात येऊन सर्व सुविधांनी युक्त आपल्या हक्काचे घर मिळवून देण्यात आले. अशा पूर्ण घरकुलांचा ई गृहप्रवेश कार्यक्रम राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, ग्राम विकास मंत्री यांच्या ऑनलाईन उपस्थितीत आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रमात तळेगाव ठाकूर ग्राम पंचायत येथील घरकुल लाभार्थींना ई चावी देऊन साजरा करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख उपस्थितीत पंचायत समिती, तिवसा सभापती सौ. शिल्पाताई हांडे, उपसभापती शरदभाऊ वानखेडे, सदस्य कल्पनाताई दिवे, नीलेश खुळे, सत्तारभाई मुल्ला, मुकुंद पुणसे, सरपंच दर्शना मारबदे यांसह नागरिक व घरकुल लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
===Photopath===
170621\img-20210617-wa0019.jpg
===Caption===
महाआवास योजनेअंतर्गत लाभार्थयांचा ई गृहप्रवेश करतांनी उपस्थित मान्यवर