ई-ऑफिस’ प्रणाली कर्मचाऱ्यांसाठी बनली युजर फ्रेंडली; झेडपीत पहिल्या टप्प्यात दोन विभागाचे कामकाज ऑनलाइन
By जितेंद्र दखने | Published: October 26, 2023 07:42 PM2023-10-26T19:42:11+5:302023-10-26T19:42:24+5:30
केंद्र व राज्य शासनाच्या विविध पायलट प्रोजेक्टसह विविध नावीन्यपूर्ण उपक्रम जिल्हा परिषदेच्या अंतर्गत राबविले जातात.
अमरावती: केंद्र व राज्य शासनाच्या विविध पायलट प्रोजेक्टसह विविध नावीन्यपूर्ण उपक्रम जिल्हा परिषदेच्या अंतर्गत राबविले जातात. माहिती तंत्रज्ञानाच्या जमान्यात आता जिल्हा परिषदेने आपला कारभार पेपरलेस करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. याचाच एक भाग म्हणून सीईओ अविश्यांत पंडा यांच्या पुढाकारातून सामान्य प्रशासन व पंचायत विभागाचे पहिल्या टप्प्यात प्रशासकीय कामकाज ई-ऑफिस’ प्रणालीद्वारे सुरू केले आहेत. विशेष म्हणजे ई-ऑफिस’ प्रणाली कर्मचाऱ्यांसाठी बनली युजर फ्रेंडली बनली असून यामुळे कोणती फाइल कोणत्या टप्प्यावर आहे ही लगेच माहितीसुद्धा मिळत आहे. ऑनलाइन कामकाजामुळे जिल्हा परिषद हायटेक होण्याकडे वाटचाल सुरू झाली आहे.
एकविसाव्या शतकामध्ये माहिती करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. तंत्रज्ञान हा आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनला आहे. माहिती तंत्रज्ञान जगासाठी वरदान सिद्ध होत आहे. लहान मुलांपासून ते वयस्कर आजी आजोबापर्यंत तंत्रज्ञानाच्या उपकरणाचा वापर करताना दिसत आहेत. झेडपी सीईओंनी आपल्या स्वत:च्या कार्यालयात‘ई-ऑफिस’ प्रणालीचा वापर सुरू केला होता. यानंतर आता सीईओ अविश्यांत पंडा व सामान्य प्रशासनचे डेप्युटी सीईओ गिरीश धायगुडे यांच्या प्रयत्नाने सामान्य प्रशासन विभाग व पंचायत विभाग या विभागाची कामकाज शंभर टक्के ई-ऑफिस’ प्रणालीद्वारे सुरू केले आहे. यामुळे जीएडी व पंचायत विभागातील ही ई-ऑफिस’ प्रणाली कर्मचाऱ्यांसाठी युजर फ्रेंडली बनली आहे. या प्रणालीमुळे कोणती फाइल कोणत्या टप्प्यावर आहे याची माहिती लगेच मिळते. या प्रणालीमुळे फाइल गहाळ होत नाही व कोणत्याही फाइलला विलंबसुद्धा करता येत नाही. सदर प्रणाली सर्व विभागात सुरू करण्याचा येत्या महिन्यात जिल्हा परिषद प्रशासनाद्वारे सुरू केली जाणार आहे.
कार्यालयांमध्ये ‘ई-ऑफिस’ प्रणालीचा वापर सुरू केल्यास कामकाजाला गती येईल, शिवाय सध्या दोन विभागाचे कामकाज संपूर्णपणे कागदविरहित (पेपरलेस) होत असल्याने अधिक सुलभता येणार आहे, येत्या महिनाभरात झेडपीच्या सर्व विभागात ‘ई-ऑफिस’ प्रणाली सुरू केली जाणार आहे. - अविश्यांत पंडा, मुख्यकार्यकारी अधिकारी
१०० टक्के ऑनलाइन कामकाजावर भर
आगामी काही महिन्यात जिल्हा परिषदेतील कामकाज १०० टक्के काम हे ऑनलाइन करण्याचा जिल्हा परिषद प्रशासनाचा मानस आहे. पहिल्या दोन विभागाचे कामकाज टप्प्यात ई-ऑफिस, प्रणालीद्वारे सुरू केले आहे. उर्वरित सर्व विभागाचे कामकाजही ई-ऑफिस, प्रणालीद्वारे सुरू केले जाणार आहे.